-
सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र आल्यानंतर ‘इंडिया’ नाव आलं. मात्र, या नावाची भीती वाटायला लागली आहे. आता इंडिया नाव बदलायचा घाट घातला जात आहे. भारत हा आमचा आहे. आम्ही त्याला इंडिया, हिंदुस्थान पण बोलू. बरं ते भारत तरी म्हणतात. नाहीतर स्वत:चे नाव देऊन टाकतील, असा टोला शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.
-
“आम्ही नाव नाही, तर पंतप्रधान बदलणार आहे”, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ते जळगावमधील सभेत बोलत होते.
-
“हे आधी म्हणायचे विरोधकच नाहीत. पण, आता एवढे घाबरले आहेत. इंडिया नावाची यांना खा**** सुटली आहे. म्हणून पक्ष फोडाफोडी सुरू केली आहे,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.
-
“ही लोक देशाला भारत म्हणताहेत हेच नशीब समाजायचं. लक्षात ठेवा भारत आमचा आहे. आम्ही त्याला इंडिया, हिंदुस्थानही म्हणू. आता आम्ही सुद्धा बदल करणार आहोत. पण आम्ही नाव नाहीतर देशाचा पंतप्रधान बदलणार आहोत,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
-
उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपाला कोणताही विचार नव्हता. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाची दिशा दाखवली नसती, तर तळागळात कुठे गेला असता, कळलं नसतं.”
-
“‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ हा नारा शिवसेनाप्रमुखांनी बुलंद केला. म्हणून भाजपाला ही सत्ता मिळाली आहे. ‘तुम्ही देश सांभाळा, आम्ही महाराष्ट्र सांभाळतो,’ असं शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं. पण, देश, महाराष्ट्र, मुंबई, बाजार समित्या, सोसायटीही यांना पाहिजे. दिसेल तिथे घुसेल. सगळीकडे आम्हीच,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला आहे.
“इंडियाची भीती वाटायला लागली, पण आम्ही नाव नाहीतर…”, उद्धव ठाकरे पंतप्रधानांवर हल्लाबोल
“…म्हणून भाजपाला ही सत्ता मिळाली आहे”, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
Web Title: Uddhav thackeray attacks pm narendra modi over india name ssa