• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ajit pawar comment on sharad pawar praful patel rohit pawar gopichand padalkar pbs

शरद पवार-प्रफुल्ल पटेलांचा फोटो, अमित शाहांच्या दौऱ्यात गैरहजेरी ते गोपीचंद पडळकरांचा प्रत्युत्तर, वाचा अजित पवार काय म्हणाले…

अजित पवार यांनी रविवारी (२४ सप्टेंबर) पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवार-प्रफुल्ल पटेलांचा फोटो, अमित शाहांच्या दौऱ्यात गैरहजेरीपासून त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

September 24, 2023 18:14 IST
Follow Us
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (२४ सप्टेंबर) पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवार-प्रफुल्ल पटेलांचा फोटो, अमित शाहांच्या दौऱ्यात गैरहजेरीपासून त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
    1/24

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (२४ सप्टेंबर) पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवार-प्रफुल्ल पटेलांचा फोटो, अमित शाहांच्या दौऱ्यात गैरहजेरीपासून त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

  • 2/24

    यावेळी अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांचं नाव न घेता टोलाही लगावला. यावेळी ते नेमकं काय म्हणाले त्याचा हा आढावा…

  • 3/24

    हा असं म्हटला, तो तसा म्हटला यावर मला बोलायचं नाही – अजित पवार

  • 4/24

    सध्या वाचाळवीरांची संख्याच वाढली आहे – अजित पवार

  • 5/24

    त्यांच्या वक्तव्यावर आपण काहीतरी वक्तव्य करणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि परंपराही नाही. आपण आपलं काम करत रहायचं – अजित पवार

  • 6/24

    आता भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात कुणीच शिल्लक राहणार नाही. सगळेच आपआपले बोर्ड लावतील – अजित पवार

  • 7/24

    माझे बोर्ड लावले तेव्हा मी मागेच सांगितले की, असे बोर्ड लावून काहीच होत नाही. केवळ कार्यकर्त्याला समाधान मिळतं – अजित पवार

  • 8/24

    कुणी कुणाचे बोर्ड लावायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यावर मी प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही – अजित पवार

  • 9/24

    असं असलं तरी जोपर्यंत एखादी व्यक्ती १४५ चा जादुई आकडा गाठू शकत नाही. तोपर्यंत हे दिवा स्वप्नच राहतं – अजित पवार

  • 10/24

    पत्रकारांनी अजित पवारांना “तुमचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न आगामी काळात पूर्ण होईल का?”, असाही प्रश्न विचारला. त्यावरही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

  • 11/24

    माझं काम सुरू आहे. १९९१ मध्ये या शहराने मला खासदार केलं तेव्हापासून मी काम करतो आहे – अजित पवार

  • 12/24

    मला कामाची आवड आहे. मी कामासाठी वेळ देतो. सकाळी लवकर माझ्या कामाची सुरुवात होते. हे सर्वांना माहिती आहे – अजित पवार

  • 13/24

    मी काल, २३ सप्टेंबरला बारामतीत होतो, त्यामुळे अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याला हजर राहू शकलो नाही – अजित पवार

  • 14/24

    मी जसा २४ सप्टेंबरला दिवसभर पिंपरी चिंचवडला वेळ दिली होती, २५ सप्टेंबरला दिवसभर पुण्याला वेळ दिली, तशीच २३ सप्टेंबरला बारामतीला वेळ दिली होती – अजित पवार

  • 15/24

    मी वर्षानुवर्षे बारामतीचं नेतृत्व करतो आहे. बारामतीच्या पाच संस्था, सहयोग गृहनिर्माण संस्था, बारामती बँक, बारामती खरेदी संघ, बारामती दुध संघ, बारामती बाजार समिती या सगळ्या संस्थांची वार्षिक बैठक असते. ती बैठक मला चुकवायची नव्हती. या बैठकीची तारीख ठरवून १५ दिवस आधी अजेंडा काढला जातो – अजित पवार

  • 16/24

    त्यामुळे मी अमित शाहांच्या कार्यालयाला हे कळवलं होतं की, अमित शाहांचा दौरा असला, तरी तिथे मी नाही. माझा आधीच दौरा ठरला आहे – अजित पवार

  • 17/24

    मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याही कानावर ही गोष्ट घातली होती – अजित पवार

  • 18/24

    मी बारामतीत होतो आणि संध्याकाळी बारामतीतील काही गणेश मंडळाच्या भेटी आणि इतर कार्यक्रम होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत माझं ते काम सुरू होतं – अजित पवार

  • 19/24

    मला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांच्या फोटोवर काहीही बोलायचं नाही – अजित पवार

  • 20/24

    माध्यमं याचा फोटो आणि त्याचा फोटो असं विचारता. माझं ते काम नाही. तुम्ही विकासाबद्दल मला विचारा – अजित पवार

  • 21/24

    मी सातत्याने महाराष्ट्रात फिरत असताना विकास करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी एक भूमिका घेतली आहे – अजित पवार

  • 22/24

    माझं काम त्या पद्धतीने सुरू आहे. मी माझ्या ज्या बैठका घेतो आहे, आढावा घेतो आहे त्यात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रश्नांना गती देतो आहे – अजित पवार

  • 23/24

    त्यासाठी १५ दिवसांनी, तीन आठवड्यांनी बैठका घेत असतो – अजित पवार

  • 24/24

    ती कामं कशामुळे थांबली आहेत, का पुढे जात नाहीत, काय अडचणी आहेत हे सोडवतो. याचा आढावा घेतला की आपोआप त्या कामाला गती मिळते – अजित पवार (सर्व छायाचित्रे – अजित पवार ट्विटर))

TOPICS
अजित पवारAjit Pawarअमित शाहAmit Shahगोपीचंद पडळकरGopichand Padalkarरोहित पवारRohit Pawarशरद पवारSharad Pawar

Web Title: Ajit pawar comment on sharad pawar praful patel rohit pawar gopichand padalkar pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.