• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. manoj jarange comment on viral message about maratha reservation pbs

व्हायरल मेसेजमुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर मनोज जरांगे म्हणाले…

बुधवारी (१ नोव्हेंबर) उपोषणाच्या आठव्या दिवशी मनोज मनोज जरांगे नेमक काय म्हटलं याचा हा आढावा…

Updated: November 2, 2023 09:03 IST
Follow Us
  • मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी आंदोलन चिघळण्यावर आणि व्हायरल मेसेजमुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर भाष्य केलं.
    1/15

    मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी आंदोलन चिघळण्यावर आणि व्हायरल मेसेजमुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर भाष्य केलं.

  • 2/15

    बुधवारी (१ नोव्हेंबर) उपोषणाच्या आठव्या दिवशी मनोज जरांगे यांनी नेमक काय म्हटलं याचा हा आढावा…

  • 3/15

    आंदोलन चिघळवण्यात सरकारची भूमिका आहे का? तुम्हाला आंदोलनस्थळावरून उठवण्याचं षडयंत्र आहे का? असा प्रश्न मनोज जरांगेंना विचारण्यात आला.

  • 4/15

    सरकार मला आंदोलनस्थळावरून उठवू शकत नाहीत. त्यांचा याच्यात १०० टक्के डाव दिसत आहे – मनोज जरांगे पाटील

  • 5/15

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचाही त्यात सहभाग आहे – मनोज जरांगे पाटील

  • 6/15

    हे आंदोलन फार मोठं झालं आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही आंदोलनस्थळावरून उठणार नाही – मनोज जरांगे पाटील

  • 7/15

    आमच्याकडून उद्रेक होणार नाही, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. आमचं आंदोलन शांततेत चालू आहे, शांततेतच चालू राहणार आहे – मनोज जरांगे पाटील

  • 8/15

    मेसेज व्हायरल करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, काय आवाहन कराल?” या प्रश्नावर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली.

  • 9/15

    मराठा समाजाचे तरुण शांततेत आंदोलन करत आहेत. हा संभ्रम सरकारी पक्षाचेच लोक निर्माण करत असावेत – मनोज जरांगे पाटील

  • 10/15

    बीड, केजचे साखळी उपोषणाला बसलेल्या आमच्या लोकांना पोलिसांनी विनाकारण उचलून नेलं – मनोज जरांगे पाटील

  • 11/15

    यावरून हे कळतं की, प्रशासन सरकारच्या पुढेपुढे करत आहे – मनोज जरांगे पाटील

  • 12/15

    हिंसाचार करणारे बाजूला राहिले आणि शांततेत आंदोलन करणाऱ्यांचं साखळी उपोषण बंद केलं जात आहे – मनोज जरांगे पाटील

  • 13/15

    जर त्यांना सोडलं नाही, तर बीडचे पोलीस अधीक्षक मराठा आंदोलकांवर कसे अन्याय करतात ते मी पाहतो – मनोज जरांगे पाटील

  • 14/15

    असं असलं तरी त्या कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळाली आहे – मनोज जरांगे पाटील

  • 15/15

    जर तातडीने अधिवेशन घेण्यावर व मराठा आरक्षण देण्यावर आज निर्णय घेतला नाही, तर मी आज संध्याकाळपासून पाणी सोडणार आहे – मनोज जरांगे पाटील (सर्व छायाचित्र – संग्रहित, लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeमनोज जरांगे पाटीलManoj Jarange Patilमराठा आरक्षणMaratha Reservation

Web Title: Manoj jarange comment on viral message about maratha reservation pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.