• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. disturbance in the pawar family at the event in baramati reaction of supriya sule and ajit pawar drew attention pvp

बारामतीतल्या कार्यक्रमात पवार कुटुंबीयात दुरावा; ‘अशी’ होती सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची प्रतिक्रिया

बारामती येथे होणाऱ्या ‘नमो महा रोजगार मेळाव्या’साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण न देण्यावरून वाद सुरू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून पवार यांना निमंत्रण देण्यात आले.

March 2, 2024 20:01 IST
Follow Us
  • supriya-sule-ajit-pawar-at-baramati-maha-rojgar
    1/10

    बारामतीमध्ये बहुप्रतिक्षित असलेला महा रोजगार मेळावा आज संपन्न झाला. शरद पवार संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या मैदानात हा कार्यक्रम होत असताना स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि खुद्द शरद पवार यांनाच निमंत्रण न दिल्यामुळे हा कार्यक्रम राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता.

  • 2/10

    दोन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आली. त्यावर शरद पवार यांचे नावच नव्हते. निमंत्रण पत्रिकेत नाव नसले तरीही आम्ही कार्यक्रमाला जाणार अशी घोषणा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केली होती.

  • 3/10

    त्याचबरोबर शरद पवार यांनी पत्र लिहून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरी जेवणाचे निमंत्रण दिले. आज प्रत्यक्ष कार्यक्रम संपन्न होत असताना अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर उपस्थित होते.

  • 4/10

    मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यंमत्री अजित पवार यांचे स्वागत करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे आज मंचावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येताच, सुप्रिया सुळे त्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे सरसावल्या.

  • 5/10

    त्यांनी एकनाथ शिंदे यांचे हात जोडून स्वागत केले. पण तेवढ्या शिंदे यांच्या मागे असलेल्या अजित पवार यांनी जनतेकडे हात दाखवून अभिवादन करण्यास सुरुवात केली आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे दुर्लक्ष केले.

  • 6/10

    त्यानंतर सुप्रिया सुळे या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सरसावल्या. त्यांचेही सुळे यांनी स्वागत केले. यावेळेसही अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांशी नजरा-नजर करणे टाळले.

  • 7/10

    सुप्रिया सुळे यांनी मंचावर उपस्थित असलेल्या उद्योग मंत्री उदय सामंत आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशीही बातचीत केली. यावेळी त्यांच्याशेजारीच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारदेखील उपस्थित होत्या. मात्र दोघींनीही मंचावर एकमेकांशी बोलणे टाळले.

  • 8/10

    दरम्यान शरद पवारदेखील मंचावर येत असताना त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्याशी नजरा-नजर करण्याचे टाळले. शरद पवार मंचावर आले आणि तडक आपल्या जागेवर जाऊन बसले. सुप्रिया सुळे यांनी मात्र दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केले.

  • 9/10

    बारामती येथे होणाऱ्या ‘नमो महा रोजगार मेळाव्या’साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण न देण्यावरून वाद सुरू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून पवार यांना निमंत्रण देण्यात आले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून मेळाव्याची सुधारित निमंत्रणपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली.

  • 10/10

    (Express Photo Pavan Khengre)

TOPICS
अजित पवारAjit Pawarएकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमराठी बातम्याMarathi Newsशरद पवारSharad Pawarसुप्रिया सुळेSupriya Sule

Web Title: Disturbance in the pawar family at the event in baramati reaction of supriya sule and ajit pawar drew attention pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.