• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. lok sabha election 2024 why pawan singh back out from west bengal asansol seat kvg

भाजपाची भोजपुरी कलाकारांवर मदार; पण पवन सिंहची निवडणुकीतून माघार का?

Lok Sabha Election 2024 BJP Candidate : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत चार भोजपुरी कलाकारांचा समावेश करण्यात आला होता. मात्र त्यापैकी पवन सिंह यांनी दुसऱ्याच दिवशी माघार घेतली. (सर्व फोटो – PTI / ANI)

March 3, 2024 21:15 IST
Follow Us
  • Bhojpuri Actor BJP Election
    1/9

    भाजपाने शनिवारी (२ मार्च) १६ राज्यातील १९५ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत चार भोजपुरी कलाकारांचा समावेश करण्यात आला होता.

  • 2/9

    रवीकिशन, मनोज तिवारी आणि दिनेश लाल यादव निरहुआ यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर यावेळी पवन सिंह यांना पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.

  • 3/9

    हिंदी पट्ट्यात विजय मिळवण्यासाठी मागच्या निवडणुकीपासून भोजपुरी कलाकारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा पायंडा भाजपाने पाडला.

  • 4/9

    मात्र यावेळी भाजपाच्या मनसुब्याला भोजपुरी गायक आणि अभिनेते पवन सिंह यांनी हरताळ फासला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण निवडणूक लढणार नसल्याचे पवन सिंह यांनी जाहीर करून टाकले आहे.

  • 5/9

    पवन सिंह यांना आसनसोल मतदारसंघासाठी उमेदवारी दिली होती. याठिकाणी तृणमूल काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा खासदार आहेत. पनव सिंह आणि सिन्हा दोघेही मुळचे बिहारचे आहेत.

  • 6/9

    दिनेश लाल निरहुआ हेदेखील गायक आणि अभिनेते असून त्यांना उत्तर प्रदेशच्या आझमगड मतदारसंघातून दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे.

  • 7/9

    रविकिशन हे भोजपुरी आणि बॉलिवूडमधील गाजलेले कलाकार आहेत. त्यांना गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी या मतदारसंघानंतर गोरखपूर हादेखील महत्त्वाचा मतदारसंघ आहे.

  • 8/9

    रविकिशन हे भोजपुरी आणि बॉलिवूडमधील गाजलेले कलाकार आहेत. त्यांना गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी या मतदारसंघानंतर गोरखपूर हादेखील महत्त्वाचा मतदारसंघ आहे.

  • 9/9

    या चार भोजपुरी अभिनेते, गायकांसह ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांना पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या मथुरा लोकसभेसाठी तिकीट देण्यात आले आहे.

TOPICS
पंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiभारतीय जनता पार्टीBJPलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Lok sabha election 2024 why pawan singh back out from west bengal asansol seat kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.