-
तृणमूल काँग्रेसने नुकतंच पश्चिम बंगालमधील सर्व ४२ लोकसभा मतदारसंघांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. (सर्व फोटो रचना बॅनर्जी यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरून साभार.)
-
यामध्ये अभिनेत्री रजना बॅनर्जी यांचाही समावेश आहे.
-
रचना बॅनर्जी हे बंगाली चित्रपटसृष्टीतील मोठे आणि प्रसिद्ध नाव आहे. त्यांचे पश्चिम बंगालमध्ये लाखोंनी चाहते आहेत.
-
तृणमूल काँग्रेसने त्यांना पश्चिम बंगालमधील हुगळी या मतदारसंघातून तिकीट दिले आहे.
-
रचना बॅनर्जी यांना तिकीट दिल्यानंतर आता हुगळी या जागेसाठी लॉकेट चटर्जी विरुद्ध रचना बॅनर्जी असा सामना पाहायला मिळणार आहे.
-
लॉकेट चटर्जी यादेखील सिनेसृष्टीतील मोठं नाव असून त्या सध्या हुगळी मतदारसंघाच्या खासदार आहेत.
-
रचना बॅनर्जी या सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहेत.
-
मात्र छोट्या पडद्यावर त्या ‘दीदी नंबर १’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात. हा कार्यक्रम पश्चिम बंगालमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे.
-
तीन मार्च रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी दीदी यांनी नंबर १ या कार्यक्रमाला खास उपस्थिती दर्शवली होती.
-
त्यानंतर आता रचना बॅनर्जींना तृणमूल काँग्रेसकडून लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय.
-
रचना बॅनर्जी यांनी पहिले लग्न अभिनेता सिद्धांत मोहपात्रा यांच्याशी केले होते.
-
मात्र २००४ साली या दोघांनीही घटस्फोट घेतला.
-
त्यानंतर रचना बॅनर्जी यांनी प्रोबल बासू यांच्याशी लग्न केले.
-
पुढे २०१६ साली हे दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले.
-
सध्या रचना बॅनर्जी यांना एक मुलगा आहे.
-
रचना बॅनर्जी यांना तृणमूलने तिकीट दिल्यानंतर आता हुगळी मतदारसंघातून दोन अभिनेत्री एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार आहेत.
-
त्यामुळे आता या निवडणुकीत कोणाचा विजय होणार? हे पाहणं म्हत्त्वाचं ठरणार आहे.
प्रसिद्ध अभिनेत्रीला तृणमूलकडून लोकसभेची उमेदवारी, जाणून घ्या रचना बॅनर्जी कोण आहेत?
तृणमूल काँग्रेसने रचना बॅनर्जी यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे.
Web Title: Tmc chief mamata banerjee gives ticket to tv actress rachana banerjee for general election 2024 know how is she prd