• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. after lok sabha election result narayan rane meet raj thakre at shiv tirth home mumbai spl

Raj Thackeray : लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपाच्या ‘या’ दिग्गज नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट!

Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते.

Updated: June 8, 2024 13:16 IST
Follow Us
  • Narayan Rane Raj Thakre latest news
    1/11

    लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर खासदार नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर भेट घेतली आहे.

  • 2/11

    यावेळी नारायण राणे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव नितेश राणे देखील उपस्थित होते. परंतु यावेळी त्यांनी माध्यमांशी कोणतीही बातचीत केली नाही.

  • 3/11

    राज ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीत प्रचार सभा घेतली होती, याच संदर्भात त्यांचे आभार मानण्यासाठी नारायण राणे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.

  • 4/11

    राज ठाकरे यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची चर्चा देशभर सुरू झाली.

  • 5/11

    राज ठाकरे यांनी प्रत्यक्षरीत्या एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीत उतरवला नसला तरी त्यांनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यामुळे ते या लोकसभा निवडणुकीत चर्चेत राहिले.

  • 6/11

    यावर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकही होणार आहे, त्यासाठी काहीच महिने शिल्लक आहेत. त्यामुळे आता महायुतीमध्ये सामील झालेल्या मनसे आणि इतर पक्ष यांच्यातील जागांच्या वाटाघाटी कशा असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 7/11

    दरम्यान, नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून मोठा विजय प्राप्त केला. त्यांना भाजपाने यावेळेस उमेदवारी दिली होती. तर त्यांच्यासमोर उभे असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव झाला आहे.

  • 8/11

    नारायण राणेंना ४ लाख ४८ हजार ५१४ मते मिळाली तर विनायक राऊत यांना ४ लाख ६५६ मते मिळाली एकूण ४७ हजार ६५८ मतांच्या फरकाने विनायक राऊतांचा इथे पराभव झाला आहे.

  • 9/11

    नारायण राणेंनी जरी त्यांची जागा जिंकलेली असली तरी महाराष्ट्रातील इतर मतदारसंघात महायुतीला मोठा फटका बसला आहे.

  • 10/11

    २०१९ मध्ये भाजपाला सर्वाधिक २२ जागा मिळाल्या होत्या, त्या आता ९ जागांवर घसरल्या आहेत. त्यामुळे आता या सर्वांचा विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 11/11

    (सर्व फोटो- नारायण राणे/ राज ठाकरे/ विनायक राऊत, सोशल मीडिया) हेही पहा- Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचं आमरण उपोषण पुन्हा सुरु; सरकारमधील ‘या’ नेत्याने…

TOPICS
नारायण राणेNarayan Raneमराठी बातम्याMarathi Newsरत्नागिरीRatnagiriराज ठाकरेRaj Thackerayलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionसिंधुदुर्गSindhudurg

Web Title: After lok sabha election result narayan rane meet raj thakre at shiv tirth home mumbai spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.