• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. cloudburst in himachal pradesh kullu causes havoc damages houses washes away bridges spl

हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मोठा विध्वंस; बघता बघता पूल आणि दुकाने गेली वाहून, पाहा भयानक फोटो

Cloudburst In Kullu: हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मणिकर्ण खोऱ्यातील तोश नाल्यात आलेल्या पुरामुळे पूल आणि दुकाने वाहून गेली आणि अनेक घरे मातीच्या मलब्याखाली दाबली गेली आहेत आणि पाण्याखाली बुडाली आहेत. मात्र, कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.

July 31, 2024 11:56 IST
Follow Us
  • Cloudburst
    1/9

    हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील मणिकर्ण खोऱ्यातील टेकड्यांवर ढग फुटी झाली, त्यामुळे तोश या खाडी परिसरात मोठे नुकसान झाले आहे. रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, ढगफुटीमुळे स्थानिक लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (PTI Photo)

  • 2/9

    या मुसळधार पावसात दारूची दुकाने, किराणा दुकाने तसेच जवळील पूल वाहून गेला आहे. तसेच आतमध्ये मातीचा ढिगारा आणि पाणी शिरल्याने दोन हॉटेल आणि काही लोकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरा ढग फुटी झाल्यांनतर येथे गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. (Photo Source:@rajender11117/instagram)

  • 3/9

    दरम्यान, या पावसाळ्यात कुल्लू मनालीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. तोश खाडीला पूर आला असून, त्यामुळे तेथील पूल वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्याने तोश गावाचा संपर्क तुटला आहे. (Photo Source: @rajender11117/instagram)

  • 4/9

    तोश खाडीला पूर आल्यानंतर पाण्याचा प्रवाह इतका वेगवान झाला होता की त्यामुळे सर्वत्र विध्वंस झाला. दरम्यान, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. (Photo Source: @rajender11117/instagram)

  • 5/9

    मिळालेल्या माहितीनुसार, तोश गावातील खाडी परिसरात मध्यरात्री अचानक ढगफुटी झाल्याने लोकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी धाव घेतली. या घटनेनंतर प्रशासनाने महसूल विभागाचे पथक नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी रवाना केले आहे. (Photo Source: @rajender11117/instagram)

  • 6/9

    दरम्यान, तोश गावातील ढगफुटीच्या घटनेवर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. (PTI Photo)

  • 7/9

    मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिक आणि पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी आणि नदी-नाल्यांजवळ जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये येत्या दोन दिवसांत मान्सूनचा जोर वाढल्याने संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (PTI Photo)

  • 8/9

    शिमला हवामान केंद्राने ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर हवामान केंद्राने लोकांना भूस्खलन प्रवण भागात न जाण्याचे आवाहन केले आहे. (Photo Source: @rajender11117/instagram)

  • 9/9

    हे देखील वाचा- Wayanad Landslide: भूस्खलन दुर्घटनेची स्थिती काय?; १४३ जणांचा करुण अंत, सरकारकडून मदत… 

TOPICS
अवकाळी पाऊसपाऊसRainमराठी बातम्याMarathi Newsमुंबईतील पाऊसMumbai Rainमुसळधार पाऊसHeavy Rainfallहेवी रेन अलर्टHeavy Rain

Web Title: Cloudburst in himachal pradesh kullu causes havoc damages houses washes away bridges spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.