• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. congress and national conference announce alliance for jammu and kashmir assembly polls spl

जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीआधी नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसमध्ये हातमिळवणी, आघाडीच्या घोषणेनंतर काय म्हणाले नेते?

Congress and national conference alliance: जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला तीन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत.

August 23, 2024 12:13 IST
Follow Us
  • congress national confernce alliance
    1/15

    जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या सर्व ९० जागांवर नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेसबरोबर आघाडी निश्चित केली आहे.

  • 2/15

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यात बैठक झाली.

  • 3/15

    काल (२२ ऑगस्ट) फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांबरोबर बैठक पार पडल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

  • 4/15

    या बैठकीनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पत्रकारांशी संवाढ साधला.

  • 5/15

    “आमची बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात झाली. आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे”, असे ते म्हणाले.

  • 6/15

    “आघाडी म्हणून आम्ही सर्व ९० जागांसाठी करारावर स्वाक्षरी करू.”, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

  • 7/15

    जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला तीन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत.

  • 8/15

    दरम्यान, या घोषणेनंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना राहुल गांधीनी संबोधित केले.

  • 9/15

    यावेळी ते म्हणाले, “‘‘आघाडी होत आहे आणि मला आशा आहे की, आमच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना योग्य सन्मान मिळेल. स्वातंत्र्यानंतर केंद्रशासित प्रदेश राज्ये बनली आहेत, परंतु राज्य केंद्रशासित प्रदेश बनण्याची ही पहिलीच वेळ आहे.”

  • 10/15

    पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, “जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील लोकांना त्यांचे लोकशाही अधिकार परत मिळावेत, यासाठी आमचे प्राधान्य असेल, असे आम्ही जाहीरनाम्यात स्पष्ट केले आहे.”

  • 11/15

    माकप नेते एम.वाय. तारिगामी यांना आघाडीमध्ये सामील करून घेण्याबद्दल अब्दुल्ला यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. 

  • 12/15

    अब्दुल्ला यांनी आशा व्यक्त केली की लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी ही आघाडी प्रचंड बहुमताने विजयी होईल. सर्व अधिकारांसह पूर्ण राज्याचा दर्जा बहाल केला जाईल. 

  • 13/15

    अब्दुल्ला म्हणाले की, देशात सध्या असलेल्या फुटीरतावादी शक्तींना पराभूत करण्यासाठी निवडणूक लढवणे हा आमचा समान कार्यक्रम आहे.

  • 14/15

    पहिल्या टप्प्यातील निवडणुकीपूर्वी सर्व तपशील उघड केला जाईल, असे ते म्हणाले. निवडणूक लढवणार की नाही या प्रश्नावर मात्र अब्दुल्ला यांनी मौन बाळगले.

  • 15/15

    (Photos Source : Rahul Gandhi/X)

TOPICS
काँग्रेसCongressकाँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेCongress Leader Mallikarjun Khargeमराठी बातम्याMarathi Newsमल्लिकार्जुन खरगेMallikarjun Khargeराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Congress and national conference announce alliance for jammu and kashmir assembly polls spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.