-
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे.
-
भाजपाच्या जाहीरनाम्यातील काही मुद्द्यांनी लक्ष वेधलं आहे, चला जाणून घेऊयात भाजपाच्या जाहीरनाम्यात नेमकं काय आहे?
-
लाडकी बहीण योजनेचे पैसे १५०० वरुन २१०० करणार, वृद्ध पेन्शन योजनेत वाढ १५०० वरुन आता २१०० रुपये
-
जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर ठेवणार
-
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा, शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना आणणार
-
१ लाखांपेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या देणार, २५ लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य, फिनटेक आणि एआयमध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मिती होणार आणि त्यांचे केंद्र महाराष्ट्र असणार
-
२०२७ पर्यंत ५९ लाख लखपती दीदी बनवणार
-
महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करणार, विद्या वेतनाच्या माध्यमातून १० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार
-
गडकिल्ल्यांसाठी प्राधिकरण तयार करणार, महारथी मार्फत मोठ्या लॅब तयार करण्याचा प्रयत्न करणार
-
दरम्यान, ‘मी महाराष्ट्रातील जनतेला महायुती सरकारला सलग तिसऱ्यांदा जनादेश द्यावा, अशी विनंती करतो.”, असं जाहीरनामा प्रकाशनावेळी अमित शाह म्हणाले आहेत. (सर्व फोटो – लोकसत्ता संग्रहित)
हेही पाहा- Photos : ‘रानबाजार’ फेम मराठमोळी अभिनेत्री माधुरी पवारचं अजिंठा लेणीमध्ये आकर्षक फोटोशूट
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यातील ‘या’ मुद्द्यांनी वेधलं लक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत प्रकाशन
आज केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षाचा विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे.
Web Title: Bjp manifesto for maharashtra assembly election 2024 amit shah devendra fadnavis mahayuti vidhansabha nivadnuk spl