-
राम शिंदेंची विधानपरिषद सभापतीपदी निवड
विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. (PC – Maharashtra Council Live YouTube) -
उमा खापरे, शिवाजीराव गर्जे, यांनी राम शिंदेंच्या सभापतीपदाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी अनुमोदन दिले. (Photo- CMO Maharashtra)
-
त्यानंतर आवाजी मतदानाने राम शिंदेंची सभापतीपदी निवड करण्यात आली. दरम्यान, राज्याला आतापर्यंत लाभलेले विधानपरिषद सभापती आणि त्यांच्या कार्यकाळाबद्दल जाणून घेऊयात. (PC – Maharashtra Council Live YouTube)
-
स्वातंत्र्यपूर्व मुंबई विधान परिषद (१९३७ – ४७)
मंगल दास पाकवास
कार्यकाळ- २२ जुलै १९३७ – १६ ऑगस्ट १९४७
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) -
स्वातंत्र्योत्तर बॉम्बे विधान परिषद (१९४७ – १९६०)
०२) रामचंद्र सोमण
कार्यकाळ- १८ ऑगस्ट १९४७ – ०५ मे १९५२
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) -
०३) रामाराव श्रीनिवासराव हुक्केरीकर
कार्यकाळ- ०५ मे १९५२ – २० नोव्हेंबर १९५६
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) -
०४) भोगीलाल धीरजलाल लाला
कार्यकाळ- २१ नोव्हेंबर १९५२ – १० जुलै १९६०
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) -
महाराष्ट्र विधान परिषद (राज्य निर्मिती १९६०)
०५) विठ्ठल सखाराम पागे
कार्यकाळ- ११ जुलै १९६० – २४ एप्रिल १९७८
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) -
०६) राम मेघे (कार्यवाहू)
कार्यकाळ- १३ जून १९७८ – १५ जून १९७८
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) -
०७) आर. एस. गवई
कार्यकाळ- १५ जून १९७८ – २२ सप्टेंबर १९८२
(रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) -
०८) जयंत श्रीधर टिळक
कार्यकाळ- २२ सप्टेंबर १९८२ – ०७ जुलै १९९८
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) -
०९) भाऊराव तुळशीराम देशमुख (कार्यवाहू)
कार्यकाळ- २० जुलै १९९८ – २४ जुलै १९९८
(भारतीय जनता पार्टी) -
१०) एन. एस. फरांडे
कार्यकाळ- २४ जुलै १९९८ – ०७ जुलै २००४
(भारतीय जनता पार्टी) -
११) वसंत डावखरे (कार्यवाहू)
कार्यकाळ- ०९ जुलै २००४ – १३ ऑगस्ट २००४
(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) -
१२) शिवाजीराव देशमुख
कार्यकाळ- १३ ऑगस्ट २००४ – १६ मार्च २०१५
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) -
१३) रामराजे नाईक निंबाळकर
कार्यकाळ- २० मार्च २०१५ – ०७ जुलै २०१६ व
०८ जुलै २०१६ – ०७ जुलै २०२२
(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) -
१४) नीलम गोऱ्हे (कार्यवाहू)
कार्यकाळ- ०८ जुलै 2022 – डिसेंबर 2024
(शिवसेना) -
१५) राम शिंदे
कार्यकाळ- १९ डिसेंबर २०२४ बिनविरोध निवड
भारतीय जनता पार्टी
(सर्व फोटो सौजन्य- सोशल मीडिया/ विकिपिडीया/Gov Websites)
कोणत्या पक्षाकडे किती काळ राहिलं विधानपरिषदेचं सभापती पद? महाराष्ट्र विधानपरिषदेत आतापर्यंत झाले ‘इतके’ सभापती
विधानपरिषदेच्या सभापतीपदी भाजपाचे राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. दरम्यान, राज्याला आतापर्यंत लाभलेले विधानपरिषद सभापती आणि त्यांच्या कार्यकाळाबद्दल जाणून घेऊयात.
Web Title: List of chairpersons of the maharashtra legislative council and their tenure in marathi spl