• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. rahul gandhi somnath suryawanshi parabhani visit photos congress mva spl

Photos : सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी राहुल गांधी परभणीत, म्हणाले “ते दलित होते आणि…”

“सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली”, असाही खळबळजनक आरोप राहुल गांधींनी केला आहे.

Updated: December 23, 2024 23:50 IST
Follow Us
  • Rahul gandhi somnath suryawanshi parabhani visit photos
    1/9

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

  • 2/9

    त्यांनी आज परभणीतील सोमनाथ यांच्या घरी हजेरी लावली.

  • 3/9

    दरम्यान, या भेटीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत या घटनेप्रकरणी गंभीर आरोप केले.

  • 4/9

    “पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली आहे”, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. 

  • 5/9

    “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली”, असाही खळबळजनक आरोप राहुल गांधींनी केला आहे.

  • 6/9

    राहुल गांधी काय म्हणाले?
    सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबीयांची आताच मी भेट घेतली. तसेच ज्या-ज्या लोकांना मारहण झाली, त्यांच्याशी मी बोललो आहे. सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबीयांनी मला शवविच्छेदनाचा रिपोर्ट दाखवला. तसेच काही फोटो आणि व्हिडीओ देखील दाखवले. सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू हा कोठडीत झालेला आहे. पोलिसांनी सोमनाथ सुर्यवंशीची हत्या केली. मात्र, या घटनेची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत खोटं बोलले. – राहुल गांधी

  • 7/9

    “सोमनाथ सूर्यवंशी दलित आहे म्हणून मारलं गेलं. सोमनाथ सूर्यवंशी संविधानाचं रक्षण करत होता. ‘आरएसएस’ची विचारधारा ही संविधानाला संपवण्याची विचारधारा आहे. आमची मागणी आहे की या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. या घटनेत कोणतंही राजकारण होत नाही. न्याय मिळायला हवा”, असं म्हणत राहुल गांधींनी गंभीर आरोप केले आहेत.

  • 8/9

    दरम्यान त्यांच्या या भेटीचे फोटोही सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताना दिलेलं कॅप्शनही लक्ष वेधून घेत आहे. “सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या ही सरकार पुरस्कृत आहे.
    ते दलित होते आणि संविधानाचे रक्षण करत होते. मनुस्मृती मानणाऱ्या लोकांनी त्यांचा जीव घेतला आहे.” असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- राहुल गांधी सोशल मीडिया)
    हेही पाहा- 25 डिसेंबरलाचं ‘ख्रिसमस डे’ का साजरा करतात; पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? जाणून घ्या

TOPICS
डॉ. बाबासाहेब आंबेडकरDr Babasaheb AmbedkarपरभणीParbhaniभारतीय संविधानIndian Constitutionमराठी बातम्याMarathi Newsराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Rahul gandhi somnath suryawanshi parabhani visit photos congress mva spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.