• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. how many chief ministers has delhi had how long did they serve spl

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर कोण किती कार्यकाळ होतं? वाचा संपूर्ण यादी..

Delhi Chief Ministers List: दिल्लीच्या राजकारणात अनेक चढ-उतार आले आहेत. शीला दीक्षित या दिल्लीच्या सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिल्या, तर सुषमा स्वराज या सर्वात कमी काळ मुख्यमंत्री राहिल्या. आता २०२५ मध्ये दिल्लीला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे.

February 10, 2025 12:04 IST
Follow Us
  • Delhi Polls
    1/14

    दिल्लीच्या राजकारणात प्रत्येक निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा तीव्र होतात. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विजयानंतर आता नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावर कोण बसणार यावर विविध नावांची चर्चा होते आहे. (PTI Photo)

  • 2/14

    निवडणुकीत भाजपने कोणालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केले नव्हते, परंतु आता प्रवेश वर्मा, सतीश उपाध्याय, विजेंद्र गुप्ता, रेखा गुप्ता आणि आशिष सूद यांसारख्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. (PTI Photo)

  • 3/14

    पण तुम्हाला माहिती आहे का दिल्लीत आतापर्यंत किती मुख्यमंत्री सत्तेवर आले आहेत आणि ते किती दिवस सत्तेत राहिले? १९५२ ते २०२५ पर्यंत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची संपूर्ण यादी पाहूया. (Photo: Express Archive)

  • 4/14

    दिल्लीच्या सर्व मुख्यमंत्र्यांची यादी आणि त्यांचा कार्यकाळ
    १. चौधरी ब्रह्मप्रकाश यादव (१७ मार्च १९५२ – १२ फेब्रुवारी १९५५) – २ वर्षे ३३२ दिवस

    दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री चौधरी ब्रह्मप्रकाश यादव होते, जे काँग्रेस पक्षाचे होते. त्यांनी सुमारे ३ वर्षे दिल्लीत सत्ता सांभाळली. (Photo: Express Archive)

  • 5/14

    २. गुरुमुख निहाल सिंग (१३ फेब्रुवारी १९५५ – ३१ ऑक्टोबर १९५६) – १ वर्ष २६१ दिवस
    चौधरी ब्रह्मप्रकाश यांच्यानंतर गुरुमुख निहाल सिंग दिल्लीचे दुसरे मुख्यमंत्री बनले. ते देखील काँग्रेस पक्षाचे होते. (Photo: Express Archive)

  • 6/14

    ३. ३७ वर्षे उपराज्यपाल राजवट (१ नोव्हेंबर १९५६ – १ डिसेंबर १९९३)
    १९५६ मध्ये, दिल्लीला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले आणि पुढील ३७ वर्षे दिल्ली उपराज्यपालांच्या अधिपत्याखाली होती. (Photo: Express Archive)

  • 7/14

    ४. मदन लाल खुराणा (२ डिसेंबर १९९३ – २६ फेब्रुवारी १९९६) – २ वर्षे ८६ दिवस
    ३७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर, १९९३ मध्ये पुन्हा दिल्लीमध्ये निवडणूक झाली. भाजपाकडून मदनलाल खुराणा दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री बनले. (Photo: Express Archive)

  • 8/14

    ५. साहिब सिंग वर्मा (२७ फेब्रुवारी १९९६ – १२ ऑक्टोबर १९९८) – २ वर्षे २२७ दिवस
    मदनलाल खुराणा यांच्यानंतर भाजपाचे साहिब सिंग वर्मा यांनी दिल्लीची सूत्रे हाती घेतली. (Photo: Express Archive)

  • 9/14

    ६. सुषमा स्वराज (१३ ऑक्टोबर १९९८ – ३ डिसेंबर १९९८) – ५१ दिवस
    सुषमा स्वराज दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या, परंतु त्यांचा कार्यकाळ फक्त ५१ दिवसांचा होता. (Photo: Express Archive)

  • 10/14

    ७. शीला दीक्षित (३ डिसेंबर १९९८ – २८ डिसेंबर २०१३) – १५ वर्षे २५ दिवस
    शीला दीक्षित यांनी १५ वर्षे २५ दिवस दिल्लीवर राज्य केले. त्या दिल्लीच्या सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिल्या. (Photo: Express Archive)

  • 11/14

    ८. अरविंद केजरीवाल (२८ डिसेंबर २०१३ – १४ फेब्रुवारी २०१४) – ४८ दिवस
    आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच दिल्लीचे मुख्यमंत्री बनले, परंतु त्यांचा कार्यकाळ फक्त ४८ दिवस होता. (Photo: Express Archive)

  • 12/14

    ९. राष्ट्रपती राजवट (१४ फेब्रुवारी २०१४ – १४ फेब्रुवारी २०१५) – १ वर्ष
    अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत १ वर्ष राष्ट्रपती राजवट लागू राहिली. (Photo: Express Archive)

  • 13/14

    १०. अरविंद केजरीवाल (१६ फेब्रुवारी २०१५ – २१ सप्टेंबर २०२४) – ९ वर्षे २१८ दिवस
    २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने प्रचंड विजय मिळवला आणि अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री बनले. त्यांनी दिल्लीत सलग ९ वर्षे २१८ दिवस सत्ता सांभाळली. (Photo: Express Archive)

  • 14/14

    ११. आतिशी मार्लेना (२१ सप्टेंबर २०२४ – ९ फेब्रुवारी २०२५) – १४१ दिवस
    अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर, आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यांचा कार्यकाळ १४१ दिवसांचा होता. (Photo: Express Archive)
    हेही पाहा- भाजपाचा दिल्लीतील प्रवास; याआधी कितीवेळा बनवलं सरकार? कोण होते मुख्यमंत्री?

TOPICS
आम आदमी पार्टीAAPकाँग्रेसCongressदिल्लीDelhiदिल्ली विधानसभा निवडणूक २०२५Delhi Assembly Elections 2025भारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi News

Web Title: How many chief ministers has delhi had how long did they serve spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.