-
एकीकडे देशात एकता आणि बंधुत्वाची चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे भाषा वादावरून अनेक राज्यांमध्ये सध्या जोरदार संघर्ष सुरू आहे.
-
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातही मराठीवरून अनेक वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकतेच, पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विरोध केला होता. त्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला.
-
तसेच, दोन दिवसांपूर्वी मीरा-भाईंदरमध्ये मराठी बोलत नाही म्हणून एका व्यापाऱ्याला राज ठाकरे यांच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्यामुळे मुंबईत मराठीचा मुद्दा पुन्हा गाजत आहे.
-
आता मराठीचा वाद एका मोठ्या राजकीय आणि सांस्कृतिक वादात रूपांतरित झाला आहे, ज्यामध्ये केडिओनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांच्यासारख्यांनीही उडी घेतली आहे.
-
शेअर बाजार मार्गदर्शक असलेल्या सुशील केडिया यांनी एक्सवर एक पोस्ट करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टॅग केले आहे आणि म्हटले आहे की, ते मराठी शिकणार नाहीत.
-
पोस्टमध्ये केडिया यांनी म्हटले आहे की, “राज ठाकरे, तुम्ही लक्षात घ्या की मुंबईत ३० वर्षे राहूनही मला मराठी नीट येत नाही, आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांनी मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करत आहात, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही.”
-
दरम्यान, सुशील केडिया हे शेअर बाजार मार्गदर्शक आहेत. ते केडिओनॉमिक्स या शेअर बाजाराशी संबंधित संस्थेचे संस्थापकही आहेत. त्यांच्या पोस्टनुसार, ते गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत राहत आहेत. (सर्व फोटो सौजन्य: सुशील केडिया/इन्स्टाग्राम)
“मराठी भाषा शिकणार नाही”, राज ठाकरे यांना डिवचणारे सुशील केडिया कोण आहेत?
Who Is Sushil Kedia: गुरुवारी, केडिओनॉमिक्सच्या संस्थापकांनी थेट राज ठाकरेंना टॅग करत एक पोस्ट लिहिली आणि म्हटले की, मुंबईत ३० वर्षे राहूनही त्यांना मराठी नीट येत नाही.
Web Title: Kedionomics founder sushil kedia refuses to learn marathi in protest against raj thackeray mns conduct aam