Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. uddhav thackeray and raj thackeray reunite but what about aaditya thackeray and amit thackeray old allegations kvg

‘मनसे संपलेला पक्ष’ ते ‘उठ दुपारी घे सुपारी’; मनोमिलन झालं पण जुन्या जखमांचं काय?

Old Comments Thackery vs Thackeray: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पक्षीय पातळीवर एकत्र येण्याचे संकेत दिले असले तरी मागच्या काही वर्षात दोन्ही पक्षांनी एकमेकांवर येथेच्छ टिका-टिप्पणी केली होती. यातील लक्षवेधी ठरलेली विधाने पाहू.

July 5, 2025 15:40 IST
Follow Us
  • Raj Thackeray and Uddhav Thackeray together
    1/12

    राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झालं आहे. एकत्र आलो आहोत, एकत्र राहू, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरेंनीही मराठीसाठी एकत्र आल्याचे म्हटले. मात्र गेल्या काही वर्षांत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर येथेच्छ टीका केली होती. त्यातील लक्षवेधी ठरलेली काही विधानं पाहू. (Express Photo by Amit Chakravarty)

  • 2/12

    एप्रिल २०२२ रोजी आदित्य ठाकरेंनी मनसेवर केलेली टीका बरीच गाजली होती. ‘संपलेल्या पक्षावर मी प्रतिक्रिया देत नाही’, असे विधान आदित्य ठाकरेंनी केली होती. त्यावेळी राज्यात मविआचे सरकार होते. त्यानंतर जेव्हा शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर संदीप देशपांडेंनी या टीकेची परतफेड केली होती. (Loksatta Graphics)

  • 3/12

    २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही आदित्य ठाकरेंनी मनसेला लक्ष्य केले होते. “पाच वर्षांनंतर हा पक्ष झोपेतून उठला आहे. ते फक्त निवडणुकीच्या काळात जागे होतात”, अशी टीका त्यांनी केली होती. (Live video Screenshot)

  • 4/12

    काही महिन्यांपूर्वीच एप्रिल २०२५ मध्ये मुंबईतील कांदिवली येथील मराठी पाठशाला या कार्यक्रमात बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी मनसेला भाजपाची बी टीम म्हटले होते. आम्ही दिल से तर ते मनसे आहेत, असेही ते म्हणाले होते. (Express Photo by Amit Chakravarty)

  • 5/12

    २०२२ साली आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले असताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला होता. यावेळी त्यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट शेअर करत नारायण राणेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा पोटनिवडणुकीत आज अयोध्येत गेलेले शिवसेनेचे नेते शेपूट घालून बसले होते, असे म्हटले होते. (Loksatta Graphics)

  • 6/12

    जुलै २०२४ मध्ये आदित्य ठाकरेंनी सुपारीबाज पक्ष आहे, असे म्हटले होते. मनसेने एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे म्हणाले होते की, अशा टपोरी लोकांकडे लक्ष देऊ नये. निवडणूक आल्यानंतर ज्याप्रमाणे छत्र्या दिसतात, त्याप्रमाणे काही पक्ष दिसत असतात. (Live video Screenshot)

  • 7/12

    दरम्यान उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज ठाकरे यांनी त्यांना २०२२ साली एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी म्हटले की, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही.

  • 8/12

    मनसे टाइमपास टोळी
    २०२१ साली मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेने फेरीवाल्यांकडून पावतीद्वारे खंडणी वसूल करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरेंनी मनसेला टाइमपास टोळी म्हटले होते. आजच्या विजयी मेळाव्यातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुढेही एकत्र राहू, असे म्हटले आहे. पण दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी गतकाळात एकमेकांवर केलेली चिखलफेक आता कशी सावरणार? असा प्रश्न अनुत्तरीत राहतो. (Express Photo by Amit Chakravarty)

  • 9/12

    अमित ठाकरेंचीही टीका
    अमित ठाकरे यांनी माहिम विधानसभेतून निवडणूक लढवत असताना आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. वरळी विधानसभेत त्यांची कामगिरी चांगली नव्हती. वरळीतील प्रश्न सुटलेले नाहीत. तसेच सर्वांना उपलब्ध असलेला आमदार असणे आवश्यक आहे. त्यामुळेच आम्ही मनसेचा उमेदवार इथे दिला आहे, असं ते म्हणाले.

  • 10/12

    शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर डिसेंबर २०२२ बोचरी टीका केली होती. त्या म्हणाल्या, “आमच्याकडे एक असा पठ्ठ्या आहे त्याचा उठ दुपारी आणि घे सुपारी असा एकच कार्यक्रम असतो.” या टीकेला मनसेचे तत्कालीन आमदार राजू पाटील यांनी उत्तर दिले. काही लोक ‘कर भाषण, घे राशन’, या तत्त्वावर भाड्यावर घेतले आहेत, असे राजू पाटील म्हणाले होते.

  • 11/12

    आजच्या विजयी मेळाव्यातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुढेही एकत्र राहू, असे म्हटले आहे. पण दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी गतकाळात एकमेकांवर केलेली चिखलफेक आता कशी सावरणार? असा प्रश्न अनुत्तरीत राहतो. (Express Photo by Amit Chakravarty)

  • 12/12

    मराठी माणसासाठी ही एकजूट केली असून आता वेगळे व्हायचे नाही, असा निर्धारही यावेळी ठाकरे बंधूंनी केला. मात्र त्यांचा हा निश्चय किती काळ टिकतो? हे येणारा काळ ठरवेल. (Express Photo by Amit Chakravarty)

TOPICS
अमित ठाकरेAmit Thackerayआदित्य ठाकरेAaditya ThackerayमनसेMNSराज ठाकरेRaj Thackerayशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)Shivsena UBT

Web Title: Uddhav thackeray and raj thackeray reunite but what about aaditya thackeray and amit thackeray old allegations kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.