-
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Updates: मराठी जनतेचा रोष पाहून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने हिंदी भाषा सक्तीचा व त्रिभाषा सूत्रासंबंधीचा शासन निर्णय मागे घेतला आहे.
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) व (Shiv Sena) शिवसेनेने (ठाकरे) आज विजयोत्सव साजरा केला. मुंबईतील वरळी (Worli, Mumbai) येथे दोन्ही पक्षांनी विजयी मेळावा घेतला.
-
सुमारे दोन दशकानंतर ठाकरे बंधू (Raj Thackeray Uddhav Thackeray) एकाच मंचावर एकत्र दिसले.
-
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला.
-
आमची मुले इंग्रजी शाळेत शिकले, तसे बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरेही इंग्रजी शाळेत शिकले होते, पण त्यांचा मराठी अभिमान तसूभर कमी झाला नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले. मराठीसाठी यापुढेही एकजूट कायम राहो, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
-
उद्धव ठाकरे यांनीही आपल्या भाषणातून भाजपावर जोरदार टीका केली. आम्ही निवडणुकीसाठी नाही तर मराठीसाठी एकत्र आलो आहोत, असे ते म्हणाले.
-
राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आख्खं ठाकरे कुटुंब एकाच मंचावर एकत्र आलं होतं.
-
ठाकरे कुटुंबाचे हे सध्या फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
-
भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी आज राज ठाकेरंना सन्माननीय म्हटले.
-
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्या प्रकारे मराठी माणसाची एकजूट झाली होती, त्याप्रकारची एकजूट आता मराठी माणसांनी करावी. अगदी भाजपामधील मराठी माणसानेही एकत्र यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
Photos: फक्त दोन भाऊच नाही, आख्खं ठाकरे कुटुंब आलं एकत्र! विजयी मेळाव्यानंतर झालं खास फोटोसेशन!
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Sabha Family Photos: आमची मुले इंग्रजी शाळेत शिकले, तसे बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरेही इंग्रजी शाळेत शिकले होते, पण त्यांचा मराठी अभिमान तसूभर कमी झाला नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले. मराठीसाठी यापुढेही एकजूट कायम राहो, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
Web Title: Mns raj thackeray shivsena uddhav thackeray rally updates vijayi sabha family photos viral sdn