-
मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी घडवण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील सर्वच्या सर्व १२ आरोपींना सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (२१ जुलै) रद्द केली. हे वृत्त ऐकून अनेक मुंबईकरांना वेदना झाल्या असतील. ज्यांनी या स्फोटांमध्ये आपल्या जवळचे लोक गमावले त्यांना या निर्णय अमान्य असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. (PC : TIEPL)
-
सत्र न्यायालयाने साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालयाने या सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. (PC : TIEPL)
-
११ जुलै २००६ रोजी संध्याकाळी मुंबईतील लोकल ट्रेन्समध्ये ११ मिनिटांत पाच ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. चर्चगेट ते बोरिवली स्थानकांदरम्यान हे स्फोट झाले होते. (PC : TIEPL)
-
या स्फोटांसाठी कुकर बॉम्बचा वापर करण्यात होता. (PC : TIEPL)
-
चाकरमानी आपापली कार्यालयीन कामं आटपून घरी निघाले होते. रेल्वेस्थानकांवर नेहमीप्रमाणे मोठी गर्दी होती. ट्रेन्स प्रवाशांनी खचाखच भरल्या होत्या. त्याचवेळी ६:२४ ते ६:३५ च्या दरम्यान माटुंगा आणि मीरा रोड या रेल्वेस्थानकांदरम्यान सात स्फोट झाले. (PC : PTI)
-
या सात स्थानकांजवळ बॉम्बस्फोट झाले
माटुंगा रोड, माहिम जंक्शन, वांद्रे स्टेशन, खार रोड, जोगेश्वरी, बोरीवली, मीरा रोड (PC : Reuters) -
या स्फोटांमध्ये १८९ जणांचा बळी गेला होता. तर, ४६० हून अधिक जण जखमी झाले होते. (PC : Reuters)
-
पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैय्यबा ही या बॉम्बस्फोटांमागे होती. (PC : TIEPL)
-
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने या घटनेतील सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून सर्वांची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. (PC : TIEPL)
PHOTOS | ११ मिनिटांत ७ स्फोट अन् ट्रेनमध्ये मृतदेहांचा खच; मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांची धडकी भरवणारी दृश्यं
Mumbai Train Serial Blast 2006 : सत्र न्यायालयाने साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
Web Title: Mumbai train serial blast 2006 7 explosions in 11 minutes horror unfolds with photos asc