-
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन तब्बल पाच महिने उलटले आहेत. मात्र, तरीही त्यांनी मुंबईतील सातपुडा हे शासकीय निवासस्थान अद्याप सोडलेले नाही. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली आहे. (Photo – Dhananjay Mund Facebook Page)
-
मुंबईत कुठेही घर नसल्यामुळे सातपुडा हे शासकीय निवासस्थान सोडले नसल्याचे स्पष्टीकरण मुंडे यांनी दिले होते. मात्र, धनंजय मुंडे यांनी स्वत:च विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंबईतील गिरगाव चौपाटीवर असलेल्या एका सदनिकेचा उल्लेख केलेला होता. (Photo – Dhananjay Mund Facebook Page)
-
त्यामुळे मुंबईत घर असूनही धनंजय मुंडे यांनी अद्याप शासकीय निवासस्थान का सोडले नाही? यावरून विरोधकांनी सवाल उपस्थित केले आहेत. (Photo – Dhananjay Mund Facebook Page)
-
यावर आता करूणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे यांना मनाची नाही तर जनाची तरी लाज वाटली पाहिजे, अशी टीका त्यांनी केली. मंत्रीपद नसूनही ते पाच महिने शासकीय निवासस्थानाचा लाभ घेत आहेत. (Photo – Karuna Mund Facebook Page)
-
धनंजय मुंडे यांचे मुंबईत अनेक घरे असल्याचा दावा करूणा मुंडे यांनी यावेळी केला. माध्यमांसाठी प्रसारित केलेल्या व्हिडीओत त्या म्हणाल्या, मलाबार हिल, सांताक्रूझ, पवई आणि नवी मुंबईत धनंजय मुंडे यांचे फ्लॅट आहेत, असे त्या म्हणाल्या.
-
मुंबईत अनेक घरे असूनही धनंजय मुंडे बनाव करत आहेत. मुलीचे शिक्षण आणि प्रकृतीचे कारण देऊन निवासस्थान सोडत नाहीत, असा आरोप करूणा मुंडे यांनी केला.
-
दरम्यान करूणा मुंडे यांनी एक वेगळाच प्रस्ताव मांडला. त्या म्हणाल्या, मुंडेकडे घर नसेल तर माझ्या सांताक्रूझ येथील घरी त्यांनी यावे.
-
करूणा मुंडे यांनी पुढे दावा केला की, धनंजय मुंडे आठ वर्ष या फ्लॅटवर राहिलेले आहेत. इथे येऊन तुम्ही राहावे. मी कुठेतही भाड्याने घर शोधून राहते, असा प्रस्तावही त्यांनी दिला.
-
दरम्यान धनंजय मुंडे यांनी शासकीय निवासस्थान न सोडल्याबाबतचे कारण दिले आहे.
-
“मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्यासाठी योग्य नसून त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. शिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणे गरजेचे आहे. माझ्या सदनिकेचे काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार असून तशी शासनाकडे विनंती केली आहे”, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
“…तर धनंजय मुंडे यांनी माझ्या घरी राहावे”, करूणा मुंडे असे का म्हणाल्या?
Dhananjay Munde Satpuda Bungalow: मुंबईत घर असूनही पाच महिन्यापासून शासकीय निवासस्थान न सोडल्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका होत आहे. त्यातच मुंडेंकडे मुंबईत अनेक घरे असल्याचा आरोप करूणा मुंडे यांनी केला आहे.
Web Title: Dhananjay munde government bungalow row karuna munde slams says he have many flats in mumbai kvg