-
हार्दिक पांड्याने आतापर्यंत 66 एकदिवसीय सामन्यांमध्ये ३३.८० च्या सरासरीने १३८६ धावा केल्या आहेत आणि ६३ बळी घेतले आहेत. (सौजन्य – ट्विटर)
-
हार्दिक पांड्या हा तो वेगवान अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याच्या शोधात भारत खूप दिवसांपासून पाहत होता. त्याने खालच्या फळीत फलंदाजीला उतरून फिनिशर म्हणून तो काय करू शकतो, हे त्याने दाखवून दिले आहे. (सौजन्य – ट्विटर)
-
रवींद्र जडेजा हा टीम इंडियाचा थ्री डायमेंशनल खेळाडू आहे. तो फलंदाजी करू शकतो, गोलंदाजी करू शकतो आणि तो जबरदस्त क्षेत्ररक्षणही करतो. (सौजन्य – ट्विटर)
-
जडेजाने १७१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३२.६२ च्या सरासरीने २४४७ धावा केल्या आहेत. त्याने तितक्याच सामन्यात ४.९२ इकॉनॉमीसह १८९ विकेट्सही घेतल्या आहेत. (सौजन्य – ट्विटर)
-
वॉशिंग्टन सुंदर आपल्या फिरकी गोलंदाजीसह तो मोठे शॉट्स खेळण्यासाठी देखील ओळखला जातो. (सौजन्य – ट्विटर)
-
सुंदरने ९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४ डावात ४८.३३ च्या सरासरीने १४५ धावा आणि ८ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत. (सौजन्य – ट्विटर)
-
शार्दुल ठाकुर देखील एक अष्टपैलू खेळाडू असून त्याने २८ एकदिवसीय सामन्यांमध्ये २५.८० च्या सरासरीने २५८ धावा केल्या आहेत. तितक्याच सामन्यांमध्ये ठाकूरने ६.४४ च्या इकॉनॉमीसह ४० विकेट्स घेतल्या आहेत. (सौजन्य – ट्विटर)
-
दीपक हुडाने ७ एकदिवसीय डावात २५.५० च्या सरासरीने १५३ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याने ६ एकदिवसीय डावांमध्ये ४.७६ च्या इकॉनॉमीसह ३ विकेट्स घेतल्या आहेत. (सौजन्य – ट्विटर)
-
रवींद्र जडेजाच्या अनुपस्थित अक्षर पटेलने मिळालेल्या संधीचे सोने करताना, ४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४.४० च्या इकॉनॉमीसह ५३ विकेट घेतल्या आहेत. त्याने २४ एकदिवसीय डावात १७.०६ च्या सरासरीने २७३ धावा केल्या आहेत. (सौजन्य – ट्विटर)
PHOTOS: भारतीय संघासमोर अष्टपैलू खेळाडूंची मोठी रांग, निवडकर्त्यांसाठी ठरणार डोकेदुखी
आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ पुढील वर्षी भारतात खेळवला जाणार आहे. वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते खेळाडूंची निवड करणे, कारण भारताकडे खेळाडूंचा अष्टपैलू खेळाडूंची यादी मोठी आहे.
Web Title: The large number of all rounders in the indian team will be a headache for the selectors in icc odi world cup 2023 vbm