• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. team india ready for the first win under the leadership of hardik pandya snapshots of the pre match warm up against sri lanka hd import avw

IND vs SL 1st T20: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील पहिल्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज! श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधीच्या सरावाची क्षणचित्रे

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आशिया चषकात ‘मेन इन ब्लू’ ला पराभवाचा सामना करावा लागला होता. हा पहिला टी२० सामना जिंकून २०२३ सालची विजयी सुरुवात करण्याचे हार्दिक ब्रिगेडचे लक्ष्य असेल.

Updated: January 3, 2023 15:21 IST
Follow Us
  • भारतीय संघ २०२३मधील पहिला सामना मंगळवारी (३ जानेवारी) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेचील सुरुवात या सामन्याने होईल. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या मालिकेत दुखापतच्या कारणास्तव खेळू शकणार नाही. अशात हार्दिक पंड्या संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. (Express photo by Narendra Vaskar )
    1/12

    भारतीय संघ २०२३मधील पहिला सामना मंगळवारी (३ जानेवारी) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेचील सुरुवात या सामन्याने होईल. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या मालिकेत दुखापतच्या कारणास्तव खेळू शकणार नाही. अशात हार्दिक पंड्या संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. (Express photo by Narendra Vaskar )

  • 2/12

    हार्दिकच्या नेतृत्वातील युवा खेळाडूंनी भरलेला संघ श्रीलंकेविरुद्धच्या या टी२० मालिकेत गुणवत्ता सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असेल. सूर्यकुमार यादव या मालिकेत उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. (Express photo by Narendra Vaskar )

  • 3/12

    भारतीय क्रिकेट संघ सोमवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यापूर्वी सराव करत आहे.भारत आणि श्रीलंका यांच्यातील या टी२० मालिकेत भारताचे वरिष्ठ खेळाडू उपलब्ध नाहीत. यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांचा उल्लेख केला जाऊ शकतो.  (Express photo by Narendra Vaskar )

  • 4/12

    तसेच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे अनुभवी वेगवान गोलंदाज देखील दुखापतीमुळे संघातून बाहेर आहेत. अशात श्रीलंकेविरुद्ध इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, उमरान मलिक, अर्शदीप सिंग अशा काही प्रमुख युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. उभय संघांतील पहिला सामना मंगळवारी रात्री ७ वाजता वानखेडे स्टेडियमवर सुरू होईल. (Express photo by Narendra Vaskar )

  • 5/12

    पहिल्या टी२० सामन्यात शुबमन गिलला इशान किशनसोबत सलामीची संधी मिळू शकते. ऋतुराज गायकवाडही संघात आहे, पण त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळालेले नाही. यानंतर संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राहुल त्रिपाठीवर लक्ष वेधून घेऊ शकतो. त्याचवेळी उपकर्णधार सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावे लागू शकते. यानंतर दीपक हुडा आणि हार्दिक पांड्या फलंदाजीला येऊ शकतात. (Express photo by Narendra Vaskar )

  • 6/12

    सोमवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यापूर्वी सराव करताना भारताचा टी२० कर्णधार हार्दिक पांड्या. भारतीय संघाचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याकडे आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना हार्दिकने आपल्या रणनितीविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले. (Express photo by Narendra Vaskar )

  • 7/12

    सोमवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यापूर्वी सराव करताना सूर्यकुमार यादव.’द-स्काय’ अशी ओळख असणाऱ्या भारताचा ३६० डिग्री सूर्यकुमार यादव या मालिकेत उपकर्णधाराची भूमिका निभावणार आहेत. (Express photo by Narendra Vaskar )

  • 8/12

    श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याआधी हार्दिकने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्याला या पत्रकार परिषदेत संघाच्या रणनितीविषयी प्रश्न विचारला गेला. याबाबत बोलताना तो म्हणाला,“या मालिकेत खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना माझ्याकडून पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. त्यांना पूर्णपणे संधी देणे माझी जबाबदारी असेल. जेणेकरून त्यांना विश्वास होईल की ते या स्तरावर खेळण्यासाठी नक्कीच पात्र आहेत.”
    (Express photo by Narendra Vaskar )

  • 9/12

    मालिकेतही अनेक युवा खेळाडूंना संधी दिली. २०२४ टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची तयारी आतापासूनच सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. श्रीलंकेविरुद्ध मुकेश कुमार‌ व शिवम मावी हे प्रथमच भारतीय संघाचा भाग झाले आहेत. तसेच, राहुल त्रिपाठी व शुबमन यांना देखील या मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

  • 10/12

    गत आशिया चषक चॅम्पियन श्रीलंकेविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत भारताचा उत्कृष्ट विक्रम आहे. २००८-२००९ पासून भारत आणि श्रीलंका यांच्यात १७ द्विपक्षीय सामने झाले आहेत. यामध्ये भारताने १४, तर श्रीलंकेने केवळ दोनच सामने जिंकले आहेत. त्याचवेळी एकाही सामन्याचा निकाल लागला नाही. गेल्या ११ सामन्यांपासून भारतीय संघ द्विपक्षीय मालिकेत श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत आहे. गतवर्षी आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेकडून झालेल्या पराभवाचा बदलाही भारतीय संघाला घ्यायचा आहे.

  • 11/12

    पहिल्या टी२० सामन्यात शुबमन गिलला इशान किशनसोबत सलामीची संधी मिळू शकते. ऋतुराज गायकवाडही संघात आहे, पण त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळालेले नाही. यानंतर संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राहुल त्रिपाठीवर लक्ष वेधून घेऊ शकतो.

  • 12/12

    हार्दिक याला टी२० संघाचा नियमित कर्णधार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच याबाबतची घोषणा देखील होऊ शकते. तत्पूर्वी, त्याला कर्णधार म्हणून पुरेसा अनुभव देण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. यापूर्वी देखील त्याला आयर्लंड व न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी कर्णधार म्हणून संधी दिली गेलेली. या दोन्ही मालिकांमध्ये भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरलेला.

TOPICS
टी 20T20टीम इंडियाTeam Indiaश्रीलंकाSri Lankaहार्दिक पांड्याHardik Pandya

Web Title: Team india ready for the first win under the leadership of hardik pandya snapshots of the pre match warm up against sri lanka hd import avw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.