• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. jasprit bumrahs comeback after injury how many times have he been injured in the last 4 years vbm

Jasprit Bumrah Injury: दुखापतीनंतर जसप्रीत बुमराह करतोय पुनरागमन; गेल्या ४ वर्षात किती वेळा झाली आहे दुखापत, घ्या जाणून

Jasprit Bumrah Injury Updates: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एनसीएने तंदुरुस्त घोषित केले आहे. त्यामुळे १० जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिले आहे. बुमराह सप्टेंबर २०२२ नंतर संघात पुनरागमन करत आहे.

January 4, 2023 19:26 IST
Follow Us
  • Last 4 Years Bumrah Injuries
    1/9

    २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून, जसप्रीत बुमराहने भारतासाठी ३० कसोटी, ७२ एकदिवसीय आणि ६० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. परंतु त्याच्या पदार्पणाच्या दोन वर्षानंतरच, तो जवळजवळ दरवर्षी जखमी होऊ लागला आहे. (फोटो सौजन्य – ट्विटर)

  • 2/9

    माजी दिग्गज वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंगसह अनेक तज्ञांचे एक मत मांडले आहे. बुमराह खूप कमी धाव घेतअसतानाही वेगवान गोलंदाजी करतो, त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. (फोटो सौजन्य – ट्विटर)

  • 3/9

    भारत २०१८ मध्ये आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर होता. जसप्रीत बुमराहच्या तीन-चार महिन्यांच्या प्रदीर्घ दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात झेल घेण्याच्या प्रयत्नात जखमी झाला. (फोटो सौजन्य – ट्विटर)

  • 4/9

    त्यानंततर एक्स-रे मध्ये त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले. या दुखापतीमुळे तो ३ आठवडे मैदानाबाहेर होता. (फोटो सौजन्य – ट्विटर)

  • 5/9

    त्याने २०१९ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते. नंतर स्कॅनमध्ये असे दिसून आले की त्याच्या पाठीच्या खालच्या भागात ताण फ्रॅक्चर आहे, ज्यासाठी त्याला उपचारांसाठी यूकेला जावे लागेल. यादरम्यान बुमराह जवळपास ३ महिने बाहेर राहिला. (फोटो सौजन्य – ट्विटर)

  • 6/9

    जानेवारी २०२१ मध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना बुमराहच्या पोटाचे स्नायू ताणले गेले. यानंतर काही दिवसांच्या अनिश्चिततेनंतर तो उर्वरित मालिकेतून बाहेर पडला. (फोटो सौजन्य – ट्विटर)

  • 7/9

    २५ सप्टेंबर २०२२ रोजी त्याने शेवटचा सामना खेळला आणि त्यानंतर उर्वरित वर्षभर तो मैदानाबाहेर राहिला. ऑगस्टमध्ये ब्रेक दरम्यान बुमराहच्या पाठीला दुखापत झाली होती. तो आता श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून पुनरागमन करणार आहे. (फोटो सौजन्य – ट्विटर)

  • 8/9

    यावर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, आशिया कप आणि एकदिवसीय वर्ल्ड कप २०२३ खेळले जाणार आहेत. अशा परिस्थितीत बुमराहसाठी या मोठ्या स्पर्धांमध्ये तंदुरुस्त राहणे खूप महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य – ट्विटर)

  • 9/9

    कारण गेल्या वर्षी आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक व्यतिरिक्त, भारताच्या परदेश दौऱ्यांवर त्याची अनुपस्थिती स्पष्टपणे दिसून आली आहे. (फोटो सौजन्य – ट्विटर)

TOPICS
क्रिकेटCricketजसप्रीत बुमराहJasprit Bumrahटीम इंडियाTeam Indiaश्रीलंकाSri Lanka

Web Title: Jasprit bumrahs comeback after injury how many times have he been injured in the last 4 years vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.