• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. check out the list of many records virat kohli made when he scored a century in the third odi against sri lanka vbm

Virat Kohli Records: श्रीलंकेविरुद्ध वादळी शतक झळकावताना विराट कोहलीने लावली विक्रमांची रांग, पाहा यादी

Virat Kohli Latest Records: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ११० चेंडूत नाबाद १६६ धावांची खेळी केली. त्याने १३ चौकार आणि ८ षटकार मारले. या खेळीच्या जोरावर विराट कोहलीने अनेक विक्रमांची रांग लावली आहे.

January 16, 2023 19:17 IST
Follow Us
  • Virat Kohli records and his photos
    1/12

    कोहली कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावणारा खेळाडू ठरला आहे. श्रीलंकेविरुद्ध त्याने १० शतके झळकावली आहेत. त्याने सचिनला तेंडुलकरला (ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ शतके) मागे सोडले आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 2/12

    त्याने भारतीय भूमीवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या केली. कोहलीची यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १५७ होती, जी त्याने विशाखापट्टणममध्ये केली होती. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 3/12

    कोहली घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला आहे. त्याचे हे २१ वे शतक होते आणि त्याने २० शतके झळकावणाऱ्या सचिनला मागे टाकले. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 4/12

    पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीवीर नसलेल्या खेळाडूंद्वारे तो सर्वाधिक १५०+ धावा करणारा खेळाडू बनला. त्याने ही कामगिरूी ५ वेळा तर वेस्ट इंडिजच्या व्हिव्हियन रिचर्ड्सने 3 वेळा केली आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 5/12

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांच्या यादीत कोहली सामील झाला आहे. त्याने या यादीतून श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धनेला हटवले आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 6/12

    भारतातील एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० धावांचा टप्पा गाठणारा तो खेळाडू ठरला. त्याने १०६ चेंडूत हा पराक्रम केला. दुसऱ्या क्रमांकावर जॉर्ज बेली (१०९ चेंडू) आहे, ज्याने २०१३ मध्ये केले होते. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 7/12

    एकदिवसीय सामन्यांमध्ये १५०+ च्या स्ट्राइक रेटने १५० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे. या यादीत त्यांच्या आधी रोहित शर्मा आणि ईशान किशन आहेत. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 8/12

    दोन विरोधी संघांविरुद्ध १५ किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय शतके करणारा कोहली हा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने ही कामगिरी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 9/12

    त्याचवेळी सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० आणि श्रीलंकेविरुद्ध १७ शतके केली आहेत. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 10/12

    द्विपक्षीय सामन्यांमध्ये २०,००० धावा पूर्ण करणारा कोहली जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या डावातील ६२वी धावा करताच या विक्रमाला स्पर्श केला. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 11/12

    त्याच्या पुढे सचिन (२२,९६०), जॅक कॅलिस (२०,६५५) आणि कुमार संगकारा (२०,१५४) आहेत. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 12/12

    एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत १३६ षटकार लगावले आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली. (फोटो-सौजन्य ट्विटर)

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket Newsटीम इंडियाTeam Indiaविराट कोहलीVirat Kohliश्रीलंकाSri Lanka

Web Title: Check out the list of many records virat kohli made when he scored a century in the third odi against sri lanka vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.