Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. odi wc 2023 shubman gills consistent performances add to shikhar ishans problems for ruturaj prithvi and rahul vbm

ODI WC 2023: शुबमन गिलच्या फॉर्ममुळे ‘या’ खेळाडूंची उडणार झोप, विश्वचषकासाठी संघात स्थान मिळणं कठीण

Shubman Gill Performance: एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही स्पर्धा यंदा भारतात खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाने संघबांधणी सुरु केली आहे. या संघात शुबमन गिलने सलामीवीर म्हणून आपले स्थान भक्कम केले आहे. त्यामुळे इतर खेळाडूसाठी तो अडचण ठरत आहे.

January 22, 2023 18:53 IST
Follow Us
  • Shubman Gill became an obstacle for other players to get a chance in Team India
    1/9

    भारतीय संघाचा स्टार युवा सलामीवीर शुबमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज द्विशतक झळकावल्यापासून आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले आहे. त्याने न्यूझीलडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यातदेखील नाबाद ४० धावा केल्या. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 2/9

    शुबमन गिलने वनडे विश्वचषक २०२३ साठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. त्यामुळे इशान किशन, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल आणि पृथ्वी शॉ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 3/9

    त्यामुळे भारतीय संघात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही स्टार खेळाडूंसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या खेळाडूंमध्ये ३७ वर्षीय अनुभवी सलामीवीर शिखर धवनचाही समावेश आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 4/9

    धवनशिवाय युवा सलामीवीर पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड आणि केएल राहुल यांच्यासाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावणारा इशान किशन आता सलामीच्या पर्यायात गिलनंतर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 5/9

    पहिले नाव शिखर धवनचे आहे, ज्याने अनेक वेळा टीम इंडियाचे कर्णधारपदही भूषवले आहे.आधी ईशान किशन आणि आता शुभमन गिलचे द्विशतक धवनच्या दाव्यावर पाणी फेरताना दिसत आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 6/9

    पृथ्वी शॉ देशांतर्गत सामन्यांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. अलीकडेच त्याने आसामविरुद्ध रणजीमध्ये ३७९ धावांची खेळी केली होती. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 7/9

    या यादीत ऋतुराज गायकवाड हा तिसरा फलंदाज ठरू शकतो, जो एकदिवसीय विश्वचषकासाठी संघात प्रवेश करण्यास उत्सुक आहे. त्याची भारतीय संघात निवड होऊनही त्याला बऱ्याचदा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 8/9

    इशान किशनने मिळालेल्या संधीचे सोने करताना द्विशतक झळकावले होते. त्यामुळे मधल्या फळीत केएल राहुलच्या जागी इशान किशनला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 9/9

    यष्टिरक्षक केएल राहुल या यादीत चौथ्या स्थानावर येऊ शकतो, कारण त्याच्या खराब कामगिरीबद्दल त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. यामुळेच श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत राहुलला मधल्या फळीत यष्टिरक्षक म्हणून संधी देण्यात आली होती. (फोटो-सौजन्य ट्विटर)

TOPICS
ओडीआयODIक्रिकेट न्यूजCricket Newsटीम इंडियाTeam Indiaशुबमन गिलShubman Gill

Web Title: Odi wc 2023 shubman gills consistent performances add to shikhar ishans problems for ruturaj prithvi and rahul vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.