Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indian players dominate icc t20 team of the year 2022 along with virat kohli and smriti mandhana vbm

ICC T20 Team Of The Year: आयसीसीच्या सर्वोत्तम टी-२० संघात टीम इंडियाचा बोलबाला; विराट-स्मृतीसह ‘या’ खेळाडूंना स्थान

ICC T20 Team Of The Year 2022: आयसीसीने २०२२ साठी महिला आणि पुरुष असे दोन सर्वोत्तम टी-२० संघ जाहीर केले आहेत. त्यामध्ये भारतीय खेळाडूंची वर्चस्व पाहायला मिळाले. ज्यामध्ये ३ पुरुष आणि ४ महिला भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

Updated: January 23, 2023 19:30 IST
Follow Us
  • ICC T20 Team Of The Year 2022 Indian Players ICC T20 Team Of The Year 2022 Indian Players
    1/9

    आयसीसीने २०२२ साठी पुरुषांचा सर्वोत्तम टी-२० संघ जाहीर केला आहे. यामध्ये टीम इंडियाच्या तीन खेळाडूंना स्थान मिळाले आहे. ज्यामध्ये विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचा समावेश आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 2/9

    ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकातही कोहलीने आशिया कपचा फॉर्म कायम ठेवला. मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने ८२ धावांची नाबाद खेळी खेळली होती. तो या स्पर्धेतील सर्वाधिक २९६ धावा करणारा खेळाडू ठरला होता. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 3/9

    सूर्यकुमार यादव २०२२ या कॅलेंडर वर्षात १००० टी-२० धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला. २०२२ मध्ये तो ११६४ धावांसह टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. सूर्यकुमारने गेल्या वर्षी टी-२०मध्ये दोन शतके झळकावली होती. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 4/9

    आयसीसीने जाहीर केलेल्या टी-२० संघात हार्दिक पांड्या हा भारताचा तिसरा खेळाडू आहे. हार्दिक पांड्याने रोहितच्या शर्माच्या गैरहजेरीत टीम इंडियाचे नेतृत्त्व करताना, आपल्या अष्टपैलू कामगिरीने प्रभावित केले. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 5/9

    आयसीसीने २०२२ साठी महिलांचा देखील सर्वोत्तम टी-२० संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये चार भारतीय महिला खेळाडूंना स्थान मिळाले आहे. ज्यामध्ये स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, ऋचा घोष आणि रेणुका सिंग यांच्या नावांचा समावेश आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 6/9

    भारतीय सलामीवीर स्मृती मंधानासाठी २०२२ हे वर्ष खूप चांगले गेले. तिने २१ डावात ३३ च्या सरासरीने आणि १३३.४८च्या स्ट्राईक रेटने ५९४ धावा केल्या. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 7/9

    दीप्तीने तिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आयसीसी महिला टी-२० संघात स्थान मिळवले आहे. तिने २०२२ मध्ये एकूण २९ विकेट्स आणि ३७० धावा केल्या. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 8/9

    आयसीसीने त्यांच्या संघातील भारतीय युवा प्रतिभा ऋचा घोषला यष्टिरक्षकाची भूमिका सोपवली आहे. १८ सामन्यांमध्ये तिने एकूण २५९ धावा केल्या. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 9/9

    रेणुका सिंगने २०२२ मध्ये २३.९५ च्या सरासरीने आणि ६.५० च्या इकॉनॉमीने एकूण २२ विकेट घेतल्या. रेणुकाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या ७ सामन्यात एकूण ८ विकेट्स घेतल्या होत्या. (फोटो-सौजन्य ट्विटर)

TOPICS
आयसीसीICCक्रिकेट न्यूजCricket Newsटीम इंडियाTeam Indiaविराट कोहलीVirat Kohliस्मृती मानधनाSmriti Mandhana

Web Title: Indian players dominate icc t20 team of the year 2022 along with virat kohli and smriti mandhana vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.