-
सोशल मीडियावर सध्या एक ट्रेंड सुरू आहे, ज्यामध्ये सेलिब्रिटींचे बालपणाचे फोटो शेअर केले जात आहेत. ज्यात भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ज्याने आयसीसीच्या तीन ट्रॉफी टीम इंडियाला जिंकून दिल्या आहेत.
-
टीम इंडियाचा सध्या असलेला कर्णधार रोहित शर्मा हा फोटो मध्ये खूप ‘गोलू-मोलू’ असा दिसत असून त्याला लहानपणापासूनच बर्गर आवडतो हे आधीपासूनच सर्वांना माहिती आहे.
-
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली ज्याला किंग कोहली म्हणून देखील ओळखले जाते. त्याचा लहानपणीचा फोटोतील चेहरा आणि आत्ताच्या फोटोतील अगदी सारखा आहे असे स्पष्टपणे दिसत आहे.
-
भारतीय संघाचा टी२० कर्णधार रोहितच्या अनुपस्थित टीम इंडियाची जबाबदारी सांभाळतो आहे तो हार्दिक पांड्या देखील लहानपणी आता जसा खोडकर आहे तसाच तेव्हा असणार हे फोटोवरून काही चाहत्यांनी अंदाज बांधला आहे.
-
भारतीय क्रिकेटचा देव अशी ओळख असणारा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकर हा त्याच्या कुरळे केसांमुळे पटकन ओळखला जातो. लहानपणापासून त्याचे कुरळे केस आणि त्याचे नाक हे अगदी जसेच्या तसे आहे त्यात कुठलाच बदल झाला नाही.
-
भारतीय संघातील ‘मिस्टर ३६०’ आणि ‘द-स्काय’ अशी ओळख निर्माण झालेला सूर्यकुमार यादव हा आता जेवढा निरागस आहे तेवढाच तो बालपणी देखील होता. त्याच्या साधेपणा आणि आक्रमक फटके या दोन गोष्टीमुळे तो खूप चाहत्यांचा लाडका झाला आहे.
-
भारताचा सध्याच्या संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू यष्टीरक्षक दिनेश कार्तिक हा देखील त्या बालपणीच्या फोटोंमध्ये खूप उठून दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तो क्रिकेटमधून निवृत्ती घेणार अशी चर्चा होती.
-
टीम इंडियाचे गोलंदाजीतील वेगवान अस्त्र म्हणून ज्याच्याकडे पहिले जाते तो यॉर्केर किंग जसप्रीत बुमराह बालपणीच्या फोटोत खूप साधा आणि सरळ शांत मुलगा असा दिसत आहे. सध्या तो दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे.
-
भारतीय संघाचा यष्टीरक्षक ज्याच्याकडे ‘माही’नंतर पहिले जाते तो म्हणजे ऋषभ पंत हा सर्वांमध्ये खूप उठून दिसत आहे. मात्र त्याच्या देहरादून येथे झालेल्या कार अपघातामुळे तो मुंबईत ट्रीटमेंट घेत असून लवकरच तो टीम इंडियात पुनरागमन करेन अशी चाहत्यांना आशा आहे.
Indian Cricketers Toddler: ओळखा पाहू कोण आहेत हे चिमुकले? प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर्सचे ‘बाल’ रूप; निरागस चेहऱ्यांनी वेधून घेतले सर्वांचे लक्ष
Indian Cricketers Childhood Photos: टीम इंडियाचे आजी-माजी स्टार क्रिकेटर्स सध्या खूप चर्चेत आहेत ते त्यांच्या बालपणीच्या निरागस अशा फोटोंमुळे, कारण ते सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहेत.
Web Title: Indian cricketers toddler know who are these toddlers childish looks of famous indian cricketers the innocent faces caught everyones attention avw