-
आयपीएलच्या १६व्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग असलेला सलामीवीर डेव्हॉन कॉनवेची बॅट जोरदार तळपत आहे. कॉनवेने या मोसमात आतापर्यंत ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
-
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग असलेल्या डेव्हॉन कॉनवेचा फॉर्म खूपच प्रभावी आहे, ज्यामध्ये त्याने आतापर्यंत ९ डावात ५९.१४च्या सरासरीने ४१४ धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
-
डेव्हॉन कॉनवेचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. जेव्हा तो दक्षिण आफ्रिका सोडून न्यूझीलंडला गेला, तेव्हा त्याने आपली सर्व मालमत्ता विकली. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
-
डेव्हॉन कॉनवेला न्यूझीलंड संघात स्थान मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली, त्यानंतर त्याला अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
-
डेव्हॉन कॉनवेची पत्नी किम वॉटसनने त्याला न्यूझीलंडला जाऊन क्रिकेट करिअर करण्याचा सल्ला दिला होता, त्यानंतर त्याने हा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
-
वर्ष २०२२ मध्ये डेव्हॉन कॉनवेने किम वॉटसनला दीर्घकाळ डेट केल्यानंतर एका खाजगी समारंभात लग्न केले. किम वॉटसन क्वचितच स्टँडमध्ये कॉनवेला चीअर करताना दिसते. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
-
डेव्हॉन कॉनवेने आतापर्यंत न्यूझीलंड संघासाठी १६ कसोटी, १८ एकदिवसीय आणि ३८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
-
कॉनवेने आयपीएलमध्ये आतापर्यंत १६ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४६० धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
-
डेव्हॉन कॉनवेने आयपीएलमध्ये आतापर्यंत ८ अर्धशतकं झळकावली आहेत. ज्यामध्ये नाबाद ९२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
PHOTOS: डेव्हॉन कॉनवेने क्रिकेटसाठी विकली होती संपूर्ण संपत्ती! जाणून घ्या सीएसकेच्या सलामीवीराचा कसा होता प्रवास?
Devon Conway Cricket Journey: डेव्हॉने कॉनवे आयपीएल २०२२ पासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे. तो सीएसकेचा महत्वाचा खेळाडू असून यंदाच्या मोसमात कॉनवे सातत्याने धावा करत आहे. डेव्हॉने कॉनवे क्रिकेटचा प्रवास कसा होता जाणून घेऊया.
Web Title: Csk player devon conway started his journey to become a cricketer by selling his entire wealth vbm