Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. veteran cricketer chandu borde cricketer kedar jadhav participated in world cup rally in pune amid the sound of drums avw

World Cup 2023 Pune: ढोल ताशांच्या गजरात ‘विश्वचषक ट्रॉफी’ पुण्यात पोहोचली, सेनापती बापट रोडवरुन भव्य मिरवणूक; चाहत्यांची अलोट गर्दी

ODI World Cup 2023 Pune: वन डे आयसीसी विश्वचषक २०२३ स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तब्बल २७ वर्षांनंतर पुण्यात क्रिकेट विश्वचषकाचे सामने होणार आहेत. या निमित्ताने क्रिकेट विश्‍वकरंडक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आज पुण्यात ट्रॉफीचे जंगी स्वागत करण्यात आले.

September 26, 2023 16:46 IST
Follow Us
  • ODI World Cup Trophy 2023 reaches Pune grand procession from Senapati Bapat Road Crowd of Pune residents to see the trophy
    1/9

    मर्यादित षटकांच्या आयसीसी विश्वचषक २०२३ स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तब्बल २७ वर्षांनंतर पुण्यात क्रिकेट विश्वचषकाचे सामने होणार आहेत. या निमित्ताने क्रिकेट विश्‍वकरंडक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आज पुण्यात ट्रॉफीचे जंगी स्वागत करण्यात आले. सौजन्य- (इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    ५ ऑक्टोबर २०२३ पासून भारतात वन डे क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होत आहे. या विश्वचषकातील पाच सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. ज्यामध्ये भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणाऱ्या सामन्याचा समावेश आहे. तब्बल २७ वर्षांनंतर पुण्यात क्रिकेट विश्वचषकाचे सामने होणार आहेत. सौजन्य- (इंडियन एक्सप्रेस)

  • 3/9

    महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार आणि महाराष्ट्रातील आजी-माजी क्रिकेटपटू उपस्थित असणार आहेत. ही मिरवणूक २६ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजता सुरुवात झाली आहे. पुण्यातील सेनापती बापट रोडवरुन या मिरवणुकीला सुरुवात झाली असून कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ही मिरवणूक पोहोचणार आहे. त्यानंतर या मैदानावर संध्याकाळी चार ते सहा या कालावधीत ही ट्रॉफी लोकांना फोटो काढण्यासाठी उपलब्ध असणार आहे. सौजन्य- (इंडियन एक्सप्रेस)

  • 4/9

    वर्ल्डकप ट्रॉफीच्या या रॅलीत ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे, क्रिकेटपटू केदार जाधव यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. सेनापती बापट रोड ते शेतकरी महाविद्यालयादरम्यान रॅली काढण्यात आली. या रॅलीचे हजारो पुणेकर नागरिकांनी ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. ‘तर जितेगा भाई जितेगा इंडिया जितेगा’ आणि ‘भारत माता की जय’ हा एकच जयघोष पाहण्यास मिळाला. सौजन्य- (इंडियन एक्सप्रेस)

  • 5/9

    आज पुण्यातील सेनापती बापट रोड तेथून फर्ग्युसन महाविद्यालय मार्गे शेतकी महाविद्यालय दरम्यान वर्ल्डकप रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शेतकी महाविद्यालय येथे समाप्त होणार असून त्या ठिकाणी पुणेकर नागरिकांसाठी वर्ल्डकप पाहण्यासाठी ठेवला जाणार आहे. सौजन्य- (इंडियन एक्सप्रेस)

  • 6/9

    रोहित पवार यांनी ट्रॉफीच्या रॅलीसाठी सजवलेल्या बसविषयीही सांगितले. त्यांनी लिहिले की, “याच सजवलेल्या गाडीतून आयसीसी विश्वचषक २०२३च्या ट्रॉफीची प्रथमच पुण्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पुन्हा २५ वर्षांनीच ही ट्रॉफी भारतात येईल. त्यामुळं ट्रॉफी पाहण्यासाठी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार. हा दुर्मिळ क्षण सर्वांच्या स्मरणात राहील.” सौजन्य- (इंडियन एक्सप्रेस)

  • 7/9

    “गहुंजे येथील स्टेडियम येथे पाच सामने होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मार्फत सर्व तयारी करण्यात आली आहे. पुण्यासह जगभरातील क्रिडा प्रेमी गहुंजे स्टेडियम येथे होणार्‍या सामन्यांना मोठ्या संख्येने हजेरी लावतील,” असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला. सौजन्य- (इंडियन एक्सप्रेस)

  • 8/9

    ५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. ८ ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी फायनलचा सामना होणार आहे. तर १५ नोव्हेंबरला पहिला उपांत्य सामना होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे. सौजन्य- (इंडियन एक्सप्रेस)

  • 9/9

    भारत-पाकिस्तान हा बहुप्रतीक्षित महामुकाबला १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. पुण्यात भारतीय संघाचा सामना बांगलादेशविरुद्ध १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सौजन्य- (इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
आयसीसी विश्वचषक २०२३ICC World CupएमसीएMCAक्रिकेट विश्वचषक २०२३Cricket World Cupपुणे न्यूजPune Newsरोहित पवारRohit Pawarविश्वचषक २०२३World Cup

Web Title: Veteran cricketer chandu borde cricketer kedar jadhav participated in world cup rally in pune amid the sound of drums avw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.