• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2024 indias uncapped bowlers who take 5 wickets haul in indian premiere league akash madhwal ankit rajput varun chakravarthy yash thakur umran malik bdg

IPL 2024: भारतासाठी खेळण्याआधी आयपीएलमध्ये ५ विकेट्सची करामत करणारे गोलंदाज

India Uncapped Bowlers Who Take 5 Wickets Haul in IPL: लखनौ सुपर जायंट्स वि गुजरात टायटन्सच्या सामन्यात एलएसजीचा गोलंदाज यश ठाकूरने ५ विकेट्स घेत संघाला शानदार विजय मिळवून दिला. यशच्या आधी कोणकोणत्या अनकॅप्ड खेळाडूंनी आयपीएलमध्ये ५ विकेट्स घेतले आहेत, याचा आढावा घेऊया.

April 8, 2024 18:50 IST
Follow Us

India Uncapped Bowlers Who Take 5 Wickets Haul in IPL: लखनौ सुपर जायंट्स वि गुजरात टायटन्सच्या सामन्यात एलएसजीचा गोलंदाज यश ठाकूरने ५ विकेट्स घेत संघाला शानदार विजय मिळवून दिला. यशच्या आधी कोणकोणत्या अनकॅप्ड खेळाडूंनी आयपीएलमध्ये ५ विकेट्स घेतले आहेत, याचा आढावा घेऊया.

  • आकाश मढवालमुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आकाश मढवालने आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे. गेल्या मोसमात त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अवघ्या ५ धावा देत ५ विकेट घेतले होते. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर मुंबईने एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवला होता. (फोटो:मुंबई इंडियन्स)
    1/7

    आकाश मढवाल
    मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आकाश मढवालने आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे. गेल्या मोसमात त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अवघ्या ५ धावा देत ५ विकेट घेतले होते. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर मुंबईने एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवला होता. (फोटो:मुंबई इंडियन्स)

  • 2/7

    अंकित राजपूत
    किंग्स इलेव्हन पंजाब म्हणजे आताचा पंजाब किंग्सकडून खेळताना युपीचा गोलंदाज अंकित राजपूतने ५ विकेट्स घेतले होते. आयपीएलच्या ११व्या हंगामात हैदराबादविरूद्धच्या सामन्यात १४ धावा देत ५ विकेट्स घेतले होते. (फोटो:इंडियन एक्सप्रेस)

  • 3/7

    वरूण चक्रवर्ती
    कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकीपटू वरूण चक्रवर्तीने भारतासाठी पदार्पण करण्यापूर्वी आयपीएलमध्ये ५ विकेट्स घेतले होते. वरुणने आयपीएल २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फक्त २० धावा देत ५ विकेट घेतल्या. (फोटो:केकेआर)

  • 4/7

    उमरान मलिक
    आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारताचा गोलंदाज म्हणून ओळख असलेला उमरान मलिक याने आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात २५ धावा देत ५ विकेट्स घेतले होते. (फोटो:सनरायझर्स हैदराबाद)

  • 5/7

    हर्षल पटेल
    सध्या पंजाब किंग्स संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने आरसीबीकडून खेळताना ५ विकेट्स घेतले होते. आयपीएल २०२१ मध्ये पटेलने मुंबई इंडियन्सविरूद्ध २७ धावा देत ५ विकेट्स घेतले होते. (फोटो:एक्स)

  • 6/7

    यश ठाकूर
    लखनौचा वेगवान गोलंदाज यश ठाकूरने गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात भेदक गोलंदाजी केली. या गोलंदाजीसह या विदर्भवीराने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ५ विकेट्स घेतले आणि ३० धावा दिल्या. (फोटो:लखनौ सुपर जायंट्स)

  • 7/7

    अर्शदीप सिंग
    आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या अर्शदीप सिंगने २०२१ च्या मोसमात राजस्थान रॉयल्सविरुद्ध ३२ धावा देत २ विकेट घेतले होते. (फोटो:पंजाब किंग्स)

TOPICS
अर्शदीप सिंगArshdeep Singhआकाश माधवलAkash Madhwalआयपीएल २०२५IPL 2025उमरान मलिकUmran Malikमराठी बातम्याMarathi Newsहर्षल पटेलHarshal Patel

Web Title: Ipl 2024 indias uncapped bowlers who take 5 wickets haul in indian premiere league akash madhwal ankit rajput varun chakravarthy yash thakur umran malik bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.