-
उत्कृष्ट गोलंदाज
इएसक्रिकइन्फोने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये जॉनी बेयरस्टोला काही प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये पहिला प्रश्न होता की तू सामना केलेला सर्वातकृष्ट गोलंदाज कोण आहे. यावर तो उत्तर देत म्हणाला, डेल स्टेन आणि जसप्रीत बुमराह. (फोटो-पंजाब किंग्स सोशल मीडिया) -
बुमराह
जसप्रीत बुमराह हा जगातील घातक वेगवान गोलंदाजांपैकी असल्याचे मानले जाते. आपल्या यॉर्करच्या जोरावर अनेक मोठमोठ्या फलंदाजांना त्याने बाद केले आहे. (फोटो-इंडियन क्रिकेट टीम सोशल मीडिया) -
बुमराहच्या यॉर्करवर क्लीन बोल्ड
बेयरस्टो गेला काही काळ फॉर्मात नसल्याने मुंबईविरूद्ध नुकत्याच झालेल्या सामन्यात त्याच्या जागी राईली रूसोला संघात घेतले. पण तोही मोठी कामगिरी करू शकला नाही. बुमराहने त्याला आपल्या शानदार यॉर्करने क्लीन बोल्ड केले. (फोटो-मुंबई इंडियन्स सोशल मीडिया) -
फिरकीपटू
बेयरस्टोला विचारले की कोणत्या फिरकीपटूचा सामना करणं तू टाळशील, यावर त्याने भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजाचे नाव घेतले. यापुढे त्याचे कौतुक करताना जॉनी म्हणाला, तो विलक्षण गोलंदाजी करतो. (फोटो-इंडियन क्रिकेट टीम सोशल मीडिया) -
गोलंदाज
असे बरेचसे प्रश्न त्याला विचारण्यात आले. पुढील प्रश्न होता, त्याला नेटमध्ये कोणत्या गोलंदाजासमोर फलंदाजी करणे आवडत नाही, यावर त्याने जोफ्रा आर्चरचे नाव घेतले. (फोटो-मुंबई इंडियन्स सोशल मीडिया)
Photos: बुमराह बेस्ट बॉलर, इंग्लंडच्या या बॅट्समनने केलं कौतुक; रवींद्र जडेजा अफलातून फिरकीपटू
IPL 2024: जगातील अव्वल दर्जाचा गोलंदाज असलेला भारताचा जसप्रीत बुमराह हा मोठ्या मोठ्या फलंदाजांवरही चांगलाच भारी पडतो. इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज आणि आयपीएलमधील पंजाब किंग्स संघाचा भाग असलेला जॉनी बेयरस्टो याने बुमराह आणि जडेजाला उत्कृष्ट गोलंदाज असल्याचे म्हटले आहे.
Web Title: Ipl 2024 jasprit bumrah is best bowler jonny bairstow has faced and ravindra jadeja is phenomenal spinner bdg