• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. team indias star batter suryakumar yadav and wife devisha shetty know the love story vbm

PHOTOS : सूर्यकुमार यादवची ‘लव्हस्टोरी’ आहे फिल्मी, कॉलेजमध्ये झाली होती पहिली भेट

Suryakumar Devisha love story : भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अव्वल फलंदाज आहे. तो सध्या आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडिन्यसचे प्रतिनिधित्व करत असून त्याने एक शतक झळकावले आहे.

May 16, 2024 19:26 IST
Follow Us
  • Surya kumar Yadav and wife Devisha Shetty love story
    1/7

    भारतीय स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने २०२१ मध्ये वयाच्या ३१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणापूर्वी त्याने आयपीएलमध्ये खूप धुमाकूळ घातला होता. तो आयपीएलमध्ये सध्या मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो.

  • 2/7

    आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या काही वर्षांपूर्वी सूर्याने देविशा शेट्टीशी लग्न केले. पत्नी देविशाने सूर्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणात खूप मदत केली. पण हे दोघे पहिल्यांदा कसे भेटले आणि त्यांची लव्हस्टोरी कुठून सुरू झाली हे तुम्हाला माहिती आहे का, चला जाणून घेऊया.

  • 3/7

    ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या यूट्यूब शोमध्ये सूर्याने आपल्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले होते. तो म्हणाला, “मी कॉलेजमध्ये दुसऱ्या मुलासोबत बसलो होतो आणि मी दुसरीकडे बघत होतो. ती माझ्या मागून येत होती. माझ्या मित्राने हाक मारली आणि आम्ही मागे वळून पाहिले. “माझ्या मित्राने मला आणि बाजूला असलेल्या एका व्यक्तीला हाय केले.”

  • 4/7

    सूर्या पुढे म्हणाला, “मी माझ्या मित्राला विचारले, ती तुझी मैत्रीण आहे का? ओळख करुन देना. हाय-हॅलो, बाकीचे नंतर बघू. मी जाऊन बोललो. ५ मिनिटात संवाद संपला आणि ती निघून गेली. माझ्या मित्राने मला सांगितले की काहीही तुझ्या नियंत्रणात नाही. त्यावेळी बीबीएम खूप लोकप्रिय होते.

  • 5/7

    सूर्या म्हणाला, “मी माझ्या मित्राला बीबीएमचा पिन घेण्यास सांगितले, जेणेकरून प्रकरण पुढे जाऊ शकेल. माझा मित्र म्हणाला मी प्रयत्न करतो. यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी बीबीएमवर रिक्वेस्ट पाठवत राहिलो, तिकडून रद्द होत राहिल्या. त्यानंतर मी फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली, त्यानंतर ती स्वीकारण्यात आली.

  • 6/7

    स्काय पुढे म्हणाला, “संधी तरी आहे बॉस. मग तिने विचारले तू काय करते? मी माझी छाती फुगवली आणि सांगितले की मी मुंबई इंडियन्ससाठी क्रिकेट खेळतो.”

  • 7/7

    सूर्या पुढे म्हणाला, “मला वाटले की हा एक चांगला दृष्टीकोन असेल, परंतु तिच्याकडून प्रतिसाद सामान्य होता. यानंतर आम्ही भेटून बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला खूप भांडण व्हायचे, पण हळूहळू आम्ही गंभीर होत गेलो.” (Photo Source – Devisha Shetty Insta)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेट न्यूजCricket Newsमुंबई इंडियन्स (Mumbai Indians)Mumbai Indiansसूर्यकुमार यादवSuryakumar Yadav

Web Title: Team indias star batter suryakumar yadav and wife devisha shetty know the love story vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.