• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. forgetting november 19 india will now remember june 24 the indian team won the hearts of the fans by defeating australiasee photos t20 world cup 2024 arg

१९ नोव्हेंबर विसरून भारत आता लक्षात ठेवणार ‘२४ जून’ ऑस्ट्रेलियाला हरवत भारतीय संघाने जिंकली चाहत्यांची मनं; पाहा फोटो

सेंट लुसिया स्टेडियम येथे भारताकडून ऑस्ट्रेलियाला २४ धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह भारताने आता टी-२० विश्वचषक २०२४ चा उपांत्य फेरीत प्रवेश केला.

June 25, 2024 15:00 IST
Follow Us
  • india-vs-australia-t20-world-cup-2024
    1/9

    २४ जून रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० विश्वचषक सामना रंगला. या सामन्यामध्ये आपल्या उत्तम कामगिरीने भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

  • सेंट लुसिया स्टेडियम येथे भारताकडून ऑस्ट्रेलियाला २४ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताने ५ विकेट गमावून २०५ धावांचा लक्ष दिला होता.
    या विजयासह भारत आता टी-२० विश्वचषक २०२४ चा उपांत्य सामना २७ जून रोजी गयाना नॅशनल स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघ स्पर्धेतील सर्व ७ सामने जिंकून अपराजित राहिले आहे. सामन्यानंतर रोहित शर्माला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चे पुरस्कार देण्यात आले.
  • 2/9

    भारतीय कर्णधाराने फक्त ४१ चेंडूत ९२ धावा केल्या. रोहितने केवळ १९ चेंडूंमध्ये स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक झळकावले आहे.

  • ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडने अवघ्या २६ चेंडूंत अर्धशतक झळकावले.
    भारताकडून अर्शदीप सिंगने तीन आणि कुलदीप यादवने दोन विकेट घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रतेकी एक विकेट घेतली.
    ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉइनिस आणि मिचेल स्टार्कने प्रतेकी दोन विकेट, तर जोश हेझलवूडने एक विकेट घेतली.
    ऑस्ट्रेलियाला त्यांच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता, तर भारताने बांगलादेशला पराभूत केले होते.
    भारत आता आपला आगामी सामना इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे. तर अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभूत होत बांगलादेश टी-२० स्पर्धेतुन बाहेर पडले आहे. यासह ऑस्ट्रेलिया संघ ही आता या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. (सर्व फोटो : आयसीसी अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
TOPICS
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ICC T20 World Cup 2024ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमAustralia Cricket Teamक्रीडाSportsटी-२० वर्ल्ड कप २०२४T20 World Cup 2024टीम इंडियाTeam Indiaमराठी बातम्याMarathi News

Web Title: Forgetting november 19 india will now remember june 24 the indian team won the hearts of the fans by defeating australiasee photos t20 world cup 2024 arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.