• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. who is team india wicket keeper jitesh sharma wife shalaka makeshwar know what she does vbm

Jitesh Sharma Engagement : कोण आहे जितेश शर्माची भावी पत्नी शलाका मकेश्वर, जाणून घ्या ती काय करते?

Who is Team India Wicketkeeper Jitesh Sharma wife Shalaka Makeshwar : जितेश शर्माने त्याची भावी पत्नी शलाका मकेश्वरबरोबरचे फोटो शेअर केले असून दोघांची एंगेजमेंट झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता कोण आहे शलाका मकेश्वर आणि ती काय करते? जाणून घेऊ

Updated: August 11, 2024 22:10 IST
Follow Us
  • Indian team wicket keeper
    1/7

    भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज आणि आयपीएलमधील पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या ३० वर्षीय जितेश शर्माने आपल्या आयुष्यातील नवी इनिंग सुरू केली आहे. त्याने अचानक चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.(शलाका मकेश्वर/इन्स्टा)

  • 2/7

    जितेश शर्माने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत. ज्यावर चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. जितेशने त्याची गर्लफ्रेंड शलाका मकेश्वरशी एंगेजमेंट केली आहे. चला जाणून घेऊया कोण आहे शलाका मकेश्वर आणि ती काय करते. (शलाका मकेश्वर/इन्स्टा)

  • 3/7

    जितेश शर्मा आणि शलाका मकेश्वर यांनी 8 ऑगस्ट रोजी एंगेजमेंट केले, ज्याचे फोटो त्यांनी आता त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, या वेड्या जगात आम्हाला आमचे प्रेम कायमचे 8.8.8, 8 ऑगस्ट 2024 रोजी मिळाले. (शलाका मकेश्वर/इन्स्टा)

  • 4/7

    भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू जितेश शर्मा आणि शलाका मकेश्वर यांचे शुभेच्छा देत आहेत. सूर्यकुमार यादव म्हणाला की, भाऊ आणि वहिनी खूप खूप शुभेच्छा, ऋतुराज गायकवाड आणि अर्शदीप सिंग यांनीही या दोघांचे अभिनंदन केले आहे. (शलाका मकेश्वर/इन्स्टा)

  • 5/7

    जितेश शर्माची भावी पत्नी शलाका मकेश्वर ही पुण्यातील रहिवासी आहे. लिंक्डइनच्या माहितीनुसार, ती सध्या नागपूरच्या ग्लोबल लॉजिक कंपनीमध्ये वरिष्ठ चाचणी अभियंता आहे. तिला आयटी क्षेत्रातील ६ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. (शलाका मकेश्वर/इन्स्टा)

  • 6/7

    शलाका मकेश्वर खूप शिकलेली आहे. तिने प्रोफेसर राम मेघे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात शिक्षण घेतले. बडनेरा रेल्वेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बीई केले आहे. (शलाका मकेश्वर/इन्स्टा)

  • 7/7

    शलाकाने यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातून व्हीएलएसआय डिझाइनमध्ये एमटेक केले आहे. जितेश शर्मा आणि शलाका मकेश्वर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. (शलाका मकेश्वर/इन्स्टा)

TOPICS
क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsटीम इंडियाTeam Indiaपंजाब किंग्सPunjab Kingsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Who is team india wicket keeper jitesh sharma wife shalaka makeshwar know what she does vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.