-
भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून एक पॅशन आहे आणि प्रत्येक तरुणाचे देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय क्रिकेटच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी स्वतःच्या क्रिकेट अकादमी सुरू केल्या आहेत, जिथे नवोदित क्रिकेटपटूंना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळते. (फोटो: सेहवाग क्रिकेट अकादमी/फेसबुक)
-
या क्रिकेट अकादमींमध्ये तरुणांना खेळाशी संबंधित तांत्रिक ज्ञान तर दिले जातेच, शिवाय त्यांना या खेळासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्याही तयार केले जाते. चला जाणून घेऊया त्या भारतीय क्रिकेटपटूंबद्दल ज्यांनी स्वतःची क्रिकेट अकादमी सुरू केली आहे. (फोटो: सेहवाग क्रिकेट अकादमी/फेसबुक)
-
युसूफ पठाण आणि इरफान पठाण
भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांनी मिळून ‘क्रिकेट ॲकॅडमी ऑफ पठाण’ (CAP) सुरू केली आहे. या अकादमीची देशभरात ३० हून अधिक केंद्र आहेत, जिथे नवोदित क्रिकेटपटूंना उच्चस्तरीय प्रशिक्षण आणि आधुनिक सुविधा पुरविल्या जातात. (फोटो: ESPNcricinfo) -
वीरेंद्र सेहवाग
भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही ‘सेहवाग क्रिकेट अकादमी’ (SCA) स्थापन केली आहे. ही अकादमी दिल्ली/एनसीआर आणि भारताच्या इतर भागात स्थित आहे, जिथे तरुण क्रिकेटपटूंना त्यांचा खेळ सुधारण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. (फोटो: सेहवाग क्रिकेट अकादमी/फेसबुक) -
रविचंद्रन अश्विन
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने चेन्नईत ‘जेन-नेक्स्ट क्रिकेट इन्स्टिट्यूट’ सुरू केले. या अकादमीची UAE आणि UK मधील शाखांसह भारतात पाच केंद्रे आहेत. (फोटो: raviashwin.com) -
हरभजन सिंग
भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगनेही आपली क्रिकेट अकादमी ‘हरभजन सिंग इन्स्टिट्यूट ऑफ क्रिकेट’ (HSIC) सुरू केली आहे. (फोटो: ESPNcricinfo) -
या अकादमीची विशेष बाब म्हणजे शाळांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण दिले जाते. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
एमएस धोनी
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या एम.एस. धोनीने २०१७ मध्ये ‘MS Dhoni Cricket Academy’ (MSDCA) सुरू केली. (फोटो स्रोत: ESPNcricinfo) -
. ही अकादमी ‘अर्का स्पोर्ट्स’च्या (Aarka Sports) सहकार्याने चालवली जाते, ज्याचा मुख्य उद्देश तरुणांना क्रिकेटमध्ये चांगले बनवणे हा आहे. (फोटो- रॉयटर्स)
हेही वाचा- ‘या’ चित्रपटानंतर अली फजल गेला होता नैराश्यात; स्वतःला सावरुन पोहोचला हॉलीवूडपर्यंत आ…
Photos : धोनी ते सेहवाग, भारताचे ‘हे’ दिग्गज क्रिकेटर्स अकादमीच्या माध्यमातून नवे खेळाडू घडवत आहेत!
Indian Cricketers with Cricket Academies: भारतात क्रिकेट हा एक खेळ आहे ज्यामध्ये लाखो लोकांना त्यांचे करियर बनवायचे आहे. अशा परिस्थितीत अनेक प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूंनी स्वतःच्या क्रिकेट अकादमी स्थापन केल्या आहेत, जिथे नवीन क्रिकेटपटूंना खेळासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार केले जाते.
Web Title: Ms dhoni to virender sehwag indian cricketers who have their own cricket academies spl