• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. mumbai rains live updates mumbai rains photos house collapse incidents heavy rainfall floods parts of mumbai bmh

Mumbai Rains : मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्याआधी ही दृश्यं बघा…

Mumbai Rains Live Updates Mumbai rains Photos : पावसाचा जोर शनिवारी रात्रीनंतर वाढल्यानंतर मुंबईत हाहाकार उडाला

July 18, 2021 12:03 IST
Follow Us
  • मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाने मुक्काम ठोकला आहे. गुरुवारपासून पाऊस सुरू असून, शनिवारी रात्री पावसाने कहर केला. मुंबईत अतिवृष्टी झाल्याने मुंबई शहरासह उपनगरांतील अनेक भागात पूर सदृश्य परिस्थिती बघायला मिळाली. नालासोपारा परिसरातील हे दृश्य. (सर्व छायाचित्रं-एएनआय)
    1/16

    मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाने मुक्काम ठोकला आहे. गुरुवारपासून पाऊस सुरू असून, शनिवारी रात्री पावसाने कहर केला. मुंबईत अतिवृष्टी झाल्याने मुंबई शहरासह उपनगरांतील अनेक भागात पूर सदृश्य परिस्थिती बघायला मिळाली. नालासोपारा परिसरातील हे दृश्य. (सर्व छायाचित्रं-एएनआय)

  • 2/16

    हवामान खात्यानेही दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

  • 3/16

    अतिवृष्टीमुळे मुंबईत हाहाकार उडाला असून, रस्त्यांना नाल्यांचं स्वरूप आलं. रेल्वे स्थानकांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं कालव्याचं स्वरूप आलं.

  • 4/16

    मुंबईत आताही मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे हिंदमाता, सायन, किंग सर्कल, कुर्ला अशा अनेक सखल भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

  • 5/16

    सायन आणि हिंदमाताला मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. रस्त्यावर कमरे इतकं पाणी साचलं होतं. त्यामुळे पालिकेचं पथक पंपांच्या साहाय्याने पाणी काढण्याचा प्रयत्न करीत आहे.

  • 6/16

    कांदिवली पूर्वेकडील हनुमान नगर भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. पावसामुळे रविवारी पहाटे बोरिवलीमध्येही रस्ते पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळालं.

  • 7/16

    मुंबईला पुन्हा एकदा पावसानं वेठीस धरलं आहे. गुरूवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर शनिवारी रात्रीनंतर वाढल्यानंतर मुंबईत हाहाकार उडाला.

  • 8/16

    पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूकीला फटका बसला आहे. तीन रेल्वे मार्गांवरील अनेक रेल्वे स्थानकावर पाणी साचल्याने लोकल सेवा थांबवण्यात आली.

  • 9/16

    एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका बसला आहे. मुंबईकडे येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटीकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

  • 10/16

    मुंबई आणि राज्यातील विविध शहरादरम्यान धावणाऱ्या तसेच परराज्यातून येणाऱ्या गाड्या वेगवेगळ्या स्थानकांपर्यंतच धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं येणाऱ्या या गाड्या आता दादर, मनमाड, पुणे, कल्याण, इगतपुरी, देवळाली, दिवा आदी रेल्वे स्थानकांपर्यंत येणार आहेत.

  • 11/16

    मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वतीने याची माहिती दिली असून, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांनाही याचा फटका बसला आहे. दुसरीकडे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अनेक रस्त्यावर प्रचंड पाणी साचलं असून, काही भागांत रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलं होतं.

  • 12/16

    पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली असून, रेल्वे रुळावरील पाणी उपसण्याचं काम सुरू असल्याचं पश्चिम रेल्वेनं म्हटलं आहे.

  • 13/16

    शनिवारची रात्र मुंबईसाठी काळरात्र ठरली. पावसाचा जोर वाढल्यानंतर मुंबईतील विविध भागात दुर्घटना घडल्या. मुसळधार पावसामुळे चेंबूर भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला, तर विक्रोळीतही ३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • 14/16

    संततधार पावसामुळे एक झाड भिंतीवर पडले आणि मग भिंत कोसळली. यात ढिगाऱ्याखाली दबल्यानं १५ जणांना नागरिकांना प्राण गमवावे लागले.

  • 15/16

    मुंबईतील या घटनांत तब्बल १८ ते २० जणांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मुंबईत खळबळ उडाली. दरम्यान, थोड्या विश्रांतीनंतर अनेक भागात पावसाला पुन्हा सुरूवात झाली आहे.

  • 16/16

    मुंबईत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विहार लेक ओसंडून वाहू लागला आहे. या तलावातून मुंबईला पाणी पुरवठा करण्यात येतो. तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. (सर्व छायाचित्रं-एएनआय)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsमुंबई न्यूजMumbai Newsमुंबई लोकलMumbai Localमुंबईतील पाऊसMumbai Rainमुसळधार पाऊसHeavy Rainfallहेवी रेन अलर्टHeavy Rain

Web Title: Mumbai rains live updates mumbai rains photos house collapse incidents heavy rainfall floods parts of mumbai bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.