• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. gujarat flood heavy rainfall in gujarat state on red alert water logging in cities death toll rises to 28 spl

Heavy Rainfall in Gujarat: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार; बघता बघता मोठी शहरे झाली जलमय!, ‘या’ जिल्ह्यांमध्ये सर्वात वाईट अवस्था, पाहा फोटो

Heavy Rainfall in Gujarat: गुजरातमध्ये सध्या पुरामुळे हाहाकार माजला आहे. राज्यातील तब्बल 18 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.

August 29, 2024 13:20 IST
Follow Us
  • Gujarat Flood News in Hindi, Heavy Rainfall In Gujarat
    1/18

    गुजरातमध्ये सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील 18 जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. (पीटीआय)

  • 2/18

    कच्छ, द्वारका, जामनगर, राजकोट ते वडोदरा पाण्यामध्ये बुडाले आहेत. (Express Photo by Bhupendara)

  • 3/18

    वडोदरा येथे मुसळधार पाऊस आणि पुरामुळे लोकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. वडोदरामध्ये विश्वामित्री नदीला तुडुंब पूर आला आहे. (पीटीआय)

  • 4/18

    विश्वामित्री नदीचे पाणी शहरांमध्ये शिरल्याने सखल भागाला मोठा फटका बसला आहे. (Express Photo by Bhupendara)

  • 5/18

    गुजरातमध्ये पाणी साचल्याने इमारती, रस्ते आणि वाहने पाण्यात बुडाली आहेत. लष्कर मदतकार्यात गुंतले आहे. (पीटीआय)

  • 6/18

    त्याचबरोबर किमान २८ जणांचा मृत्यू झाल्याचीही बातमी आहे. (Express Photo by Bhupendara)

  • 7/18

    गुजरातमधील कच्छ, द्वारका, जामनगर, मोरबी, सुरेंद्रनगर, जुनागड, राजकोट, बोताड, गीर सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. (पीटीआय)

  • 8/18

    यासोबतच पुढील ५ दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे. (Express Photo by Bhupendara)

  • 9/18

    गुजरातमध्ये पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. (पीटीआय)

  • 10/18

    संभाव्य अतिवृष्टीमुळे राज्यातील परिस्थिती आणखी बिघडू शकते. (Express Photo by Bhupendara)

  • 11/18

    मुसळधार पावसामुळे गुजरातमधील रस्ते आणि रेल्वे मार्गही जलमय झाले आहेत. (पीटीआय)

  • 12/18

    अशा परिस्थितीत मुंबईकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेससह आठ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Express Photo by Bhupendara)

  • 13/18

    २९ ऑगस्टला म्हणजे आजरोजी हवामान खात्याने गुजरातमधील ३३ पैकी ११ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला असून उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. (पीटीआय)

  • 14/18

    वडोदरा शहर पाण्याने तुडुंब भरले आहे. लोकांच्या घरात पाणी शिरल्याची परिस्थिती आहे. अनेक घरे बुडाली. लोक आपला जीव वाचवण्यासाठी उंच ठिकाणी किंवा त्यांच्या घरांच्या छतावर चढले आणि तिथे अडकून पडले. (Express Photo by Bhupendara)

  • 15/18

    मात्र, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी अडकलेल्या लोकांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे. वडोदरामधून आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. (पीटीआय)

  • 16/18

    NDRF आणि SDRF व्यतिरिक्त, लष्कर, प्रशासन, भारतीय हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दल देखील गुजरातमध्ये अलर्ट मोडवर आहेत. लोकांच्या मदतीसाठी सातत्याने बचावकार्य सुरू आहे. (पीटीआय)

  • 17/18

    त्याचवेळी, पीएम मोदींनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली आहे. (Express Photo by Bhupendara)

  • 18/18

    हेही वाचा: Jay shah New ICC Chairman: गुजरात क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय ते आयसीसी अध्यक्षपदापर्य…

TOPICS
गुजरातGujaratपाऊसRainमराठी बातम्याMarathi Newsमुसळधार पाऊसHeavy Rainfallहेवी रेन अलर्टHeavy Rain

Web Title: Gujarat flood heavy rainfall in gujarat state on red alert water logging in cities death toll rises to 28 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.