-
Thackeray Vs Shinde PHOTO : ठाकरे-शिंदे समोरासमोर : शिवसेनेच्या फुटीनंतर आज (१६ जुलै) पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं आहे. (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सर्वांचे एकत्र फोटोसेशन : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सभागृहाच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे आज या निरोप समारंभाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वांनी एकत्र येत फोटोसेशन केलं. (फोटो-पीटीआय)
-
पहिल्या रांगेत कोण? : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राहुल नार्वेकर, राम शिंदे, नीलम गोऱ्हे, अंबादास दानवे फोटोसेशनवेळी पहिल्या रांगेत बसले होते. (फोटो-सोशल मीडिया)
-
उद्धव ठाकरे उशीरा पोहोचले : उद्धव ठाकरे त्या ठिकाणी थोडेसे उशीरा आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना बसण्यासाठी नेमकं एकनाथ शिंदे यांच्या शेजारी एक खुर्ची रिकामी होती. त्यामुळे उद्धव ठाकरे त्या ठिकाणी बसणार का? याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. (फोटो-सोशल मीडिया)
-
उद्धव ठाकरे येताच काय घडलं? : एवढंच नाही तर उद्धव ठाकरे त्या ठिकाणी दाखल झाले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसह सर्वजण जागेवरून उभे राहिले आणि उद्धव ठाकरे यांना बसण्यास सांगितलं. (फोटो-सोशल मीडिया)
-
शेजारी बसणं टाळलं : फोटोसेशनसाठी उद्धव ठाकरे दाखल झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की एकनाथ शिंदेंच्या बाजूला खुर्ची आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसणं टाळलं. (फोटो-सोशल मीडिया)
-
एकमेकांकडे पाहिलंही नाही : शिवसेनेच्या फुटीनंतर आज पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं. पण दोघांनी देखील एकमेकांकडे पाहिलंही नाही. उलट उद्धव ठाकरे येताच शिंदेंनी नजर फिरवली.(फोटो-सोशल मीडिया)
-
उद्धव ठाकरेंचा नीलम गोऱ्हेंशी संवाद : यावेळी उद्धव ठाकरे हे नीलम गोऱ्हे यांच्या शेजारी जाऊन बसले. तसेच त्यानंतर नीलम गोऱ्हे यांच्याशी काहीवेळ संभाषण देखील केल्याचं पाहायला मिळालं.(फोटो-सोशल मीडिया)
-
उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना नमस्कार : फोटोसेशन झाल्यानंतर शेवटी उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणाहून जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नमस्कार केला. तसेच राहुल नार्वेकर आणि बावनकुळे यांच्याशी संवाद साधला. (फोटो-सोशल मीडिया)
Thackeray-Shinde Photos : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले अन् शिंदेंच्या ‘या’ कृतीची चर्चा; ठाकरेंनी शेजारी बसणं टाळलं, विधानभवनात काय घडलं?
Uddhav Thackeray Eknath Shinde : शिवसेनेच्या फुटीनंतर आज (१६ जुलै) पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं आहे.
Web Title: Thackeray shinde photo video uddhav thackeray and eknath shinde face to face for the first time avoided sitting next to each other but discussed eknath shindes actions gkt