-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) वरिष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांना काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. पण महायुतीचं सरकार स्थापन झालं, तेव्हा भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं होतं. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
दरम्यान, धनंजय मुंडेंचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश होणार का? याबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात सवाल उपस्थित केले जात आहेत. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत पत्रकारांनी छगन भुजबळांना प्रश्न विचारला असता त्यावर छगन भुजबळ यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि अजित पवार हे निर्णय घेतील, असं भुजबळ यांनी सांगितलं. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
पण छगन भुजबळ यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला आणि भुजबळ हे पत्रकारांवर चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
धनंजय मुंडेंना क्लिन चीट मिळाली तर राजीनामा देण्यासंदर्भात भुजबळ यांनी एक विधान केलं होतं. त्याबाबतच प्रश्न विचारला असता भुजबळ हे चांगलेच संतापले. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
भुजबळ म्हणाले, “मुंडेंना क्लिन चीट मिळाली का? काहीतरी विचारत बसू नका. त्यांच्यावर आरोप काय आहेत? ते आरोप वेगळे आहेत. त्यांना जी क्लिन चीट मिळाली ते आरोप कृषीखात्यातील आहेत. असे प्रश्न कशाला विचारता? तुम्हाला उत्तर देणार नाही. जर वडाची साल पिंपळाला लावली तर तुमची मी तक्रार पण करेन.”(फोटो-संग्रहित छायाचित्र)
Chhagan Bhujbal : “तर तुमची तक्रार करेन”, पत्रकारांचा ‘तो’ प्रश्न अन् छगन भुजबळ भडकले; नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal On Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) वरिष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ हे एका प्रश्नावर उत्तर देताना संतापल्याचं पाहायला मिळालं.
Web Title: Chhagan bhujbal got angry with journalists after asking questions about dhananjay mundes ministerial post politics gkt