-
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.(फोटो-शिवसेना ठाकरे एक्स)
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो-शिवसेना ठाकरे एक्स)
-
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास २० मिनिटांपेक्षा जास्त चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.(फोटो-शिवसेना ठाकरे एक्स)
-
दरम्यान, राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे येत्या काळात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.(फोटो-शिवसेना ठाकरे एक्स)
-
राज ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पाऊल ठेवताच उद्धव ठाकरे यांना आनंद झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली. (फोटो-शिवसेना ठाकरे एक्स)
-
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, “आज मला खूप आनंद झाला आहे.” दरम्यान, या भेटीवेळी खासदार संजय राऊत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह आदी नेतेही उपस्थित होते.(फोटो-शिवसेना ठाकरे एक्स)
-
यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरील भेट ही बाळासाहेबांच्या फोटोसमोर झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी दोन्ही बंधूंची गळाभेटही झाली. (फोटो-शिवसेना ठाकरे एक्स)
-
दरम्यान, राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झाल्याचं बोललं जात आहे. (फोटो-शिवसेना ठाकरे एक्स)
-
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचे संकेत दिले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे.(फोटो-शिवसेना ठाकरे एक्स)
Raj Thackeray : मनसे-शिवसेना ठाकरे गटाची युती होणार? राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण
Raj Thackeray and Uddhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Web Title: Will mns shiv sena thackeray group form an alliance raj thackeray arrives at matoshree meets uddhav thackeray gkt