Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. india alliance parliament protest rahul gandhi election commission photos viral spl

Photos : ‘मतचोरी’, ‘एसआरआय’च्या मुद्द्यावर विरोधी पक्ष आक्रमक; पाहा दिल्लीतील आंदोलनाचे फोटो

INDIA bloc leaders march photos: सुमारे ३०० खासदार या मोर्चात सहभागी झाले होते. 

Updated: August 12, 2025 10:02 IST
Follow Us
  • parliament protest, rahul gandhi, india alliance protest photos, election commission
    1/13

    INDIA bloc leaders march photos: लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये कथितरीत्या झालेली मतांची चोरी, बिहारमधील मतदार फेरआढावा मोहीम या दोन मुद्द्यांवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काल (११ ऑगस्ट) विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने संसदभवनातून मोर्चा काढला. 

  • 2/13

    सुमारे ३०० खासदार या मोर्चात सहभागी झाले होते. 

  • 3/13

     विशेष म्हणजे ‘इंडिया’तून बाहेर पडलेले ‘आप’चे खासदारही मोर्चात सहभागी झाले.

  • 4/13

    बहुतांश मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

  • 5/13

    आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा विरोधकांची एकजूट पाहायला मिळाली.

  • 6/13

    विरोधी खासदारांनी संसदेच्या मकरद्वारापासून मोर्चा काढला. संसदभवनाबाहेर काही अंतरावर पोलिसांनी मोर्चा अडवला.

  • 7/13

    मोर्चासाठी रीतसर परवानगी नव्हती, तसेच, संसदेच्या आवारात जमावबंदी लागू असल्याचे सांगत पोलिसांनी विरोधी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांसह अनेक खासदारांना ताब्यात घेतले.

  • 8/13

    त्यामुळे मोर्चा संसदेपासून काही अंतरावर असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पोहोचू शकला नाही.

  • 9/13

    विरोधी पक्षांतील खासदार सोमवारी प्रत्यक्ष भेट घेऊन निवदेन देणार असल्याचे पत्र काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवले होते. मात्र आयोगाने सोमवारी दुपारी १२ वाजता ३० प्रतिनिधींसह भेटण्यास यावे, असे पत्र रमेश यांना दिले. मात्र मोर्चातील सर्व खासदार आयोगाला भेटतील, अन्यथा कोणीही आयोगाची भेट घेणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.

  • 10/13

    त्यामुळे मोर्चानंतर विरोधी पक्षांनी आयोगाला भेट दिली नाही. सर्व विरोधी खासदार एकत्रितपणे आयोगाला भेटूनच निवेदन देऊ, असे रमेश यांचे म्हणणे होते.

  • 11/13

    लोकशाहीची अवस्था काय झाली आहे बघा. ३०० खासदार निवडणूक आयोगाला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. आम्ही सगळे येऊन तुम्हाला निवेदन देतो, असे सांगतात. पण, आयोग त्यांना भेटण्यास तयार नाही. ३०० खासदार भेटले तर सत्य बाहेर येईल ही भीती आयोगाला वाटते.– राहुल गांधी, विरोधी पक्षनेते

  • 12/13

    काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना देशात अराजक निर्माण करायचे आहे. भारतातील लोकशाही नष्ट करण्याची इच्छा बाळगणाऱ्या ‘मोठ्या शक्तीं’ची भाषा राहुल गांधी बोलत आहेत. तीन लोकसभा निवडणुका आणि यादरम्यान विधानसभांमधील पराभवामुळे काँग्रेस ‘राजकीय दिवाळखोरी’च्या स्थितीत गेली आहे. – धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री

  • 13/13

    (सर्व फोटो साभार- अरुण शर्मा इन्स्टाग्राम) हेही पाहा- तुमचा CIBIL Score कमी आहे का? ‘या’ ७ सोप्या टिप्स तुमचा क्रेडिट स्कोअर ७००+ करतील…

TOPICS
आंदोलनProtestखासदारMPट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टॉपिकTrending TopicनिकालResultनिवडणूक आयोगElection Commissionप्रियांका गांधी वाड्राPriyankaGandhiमराठी बातम्याMarathi Newsराहुल गांधीRahul Gandhiसंजय राऊतSanjay RautसंसदParliament

Web Title: India alliance parliament protest rahul gandhi election commission photos viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.