-
Suraj Chavan : छावा संघटनेच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी सूरज चव्हाण यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर सूरज चव्हाणांची युवक प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणानंतर अवघ्या महिन्याभरातच सूरज चव्हाण यांची आता राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आल्यानंतर सूरज चव्हाण यांना त्यांच्या निवडीबाबत खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, आदिती तटकरे यांच्या उपस्थितीतल नियुक्तीचं पत्र देण्यात आलं आहे. (फोटो-एनसीपी फेसबुक)
-
लातूरमध्ये सुनील तटकरे यांना एका कार्यक्रमात छावा संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने जाब विचारला म्हणून सूरज चव्हाण यांनी विजय घाडगे यांना मारहाण केली होती.(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दरम्यान, मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांच्यावर आता राष्ट्रवादी पक्षाने मोठी जबाबदारी देत युवक प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्याच्या काहीच दिवसांत बढती दिली आहे. (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मारहाण केल्यानंतर काहीच दिवसांत सूरज चव्हाणांवर मोठी जबाबदारी दिल्यामुळे ‘हाच का दादांचा वादा’, अशी टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
लातूरमधील मारहाण प्रकारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच भडकले होते. तसेच त्यांनी सूरज चव्हाण यांना युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
अजित पवारांनी पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, “लातूरमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.”(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूरज चव्हाण यांची युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून आता थेट पक्षाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
“छावा संघटनेच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादीने सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिलं. हेच का महाराष्ट्राचं ‘Good Governance?’, मारामाऱ्या करणाऱ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात? छान”, असं म्हणत अंजली दमानिया यांनी टीका केली.(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Suraj Chavan : छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणानंतर सूरज चव्हाणांवर राष्ट्रवादीने सोपवली मोठी जबाबदारी
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणानंतर अवघ्या महिन्याभरातच सूरज चव्हाण यांची आता राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे.
Web Title: Ncp has entrusted suraj chavan with a big responsibility appointed as ncps regional general secretary gkt