• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. devendra fadanvis slams ncp chief connecting different statements of sharad pawar with constitution scsg

Photos: ‘हिंदू टेरर’चा पहिल्यांदा वापरणारे ते मुस्लिमांना…; २०१३ पासूनच्या वक्तव्यांचा संदर्भ देत फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल

राज ठाकरेंपाठोपाठ आता देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांवर जुन्या नव्या वक्तव्यांचा संदर्भ देत निशाणा साधलाय.

April 14, 2022 17:32 IST
Follow Us
  • Devendra Fadanvis Slams NCP Chief Connecting different statements of Sharad Pawar with constitution
    1/21

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेकडून हे मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली जात आहे.

  • 2/21

    राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीयवाद वाढल्याची टीका राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये केल्यापासून सातत्याने राष्ट्रवादी आणि पवारांच्या भूमिकेवर मनसेकडून टीका केली जातेय.

  • 3/21

    असं असतानाच आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जंयतीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना लक्ष्य केलंय.

  • 4/21

    एक दोन नाही तब्बल १४ ट्विट करत फडणवीस यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

  • 5/21

    ‘हिंदू टेटर’पासून ते अगदी ‘मुस्लिमांना आरक्षण द्या’पर्यंतच्या पवारांच्या अनेक वक्तव्यांचा संदर्भ फडणवीसांनी दिलाय.

  • 6/21

    काश्मीर फाइल्सबद्दल पवारांनी व्यक्त केलेल्या मतावरुनही निशाणा साधत खाली संपूर्ण ट्विट थ्रेटमध्ये पवारांची अगदी २०१३ पासूनची वेगवेगळी वक्तव्यांमधून फडणवीसांनी टीका केलीय.

  • 7/21

    एकीकडे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत ज्यांनी कलम ३७० ला विरोध केला होता. पण आंबेडकरांच्या इच्छा आणि विचारसणीबद्दल काय बोललं गेलंय पाहा असं म्हणत पवारांनी कलम ३७० संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या बातमीची लिंक फडणवीसांनी पोस्ट केलीय.

  • 8/21

    “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आपण द कश्मीर फाइल्सबद्दल अनेक प्रतिक्रिया ऐकल्यात. मात्र त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीय. उलट त्या राष्ट्रवादीच्या दशकांपासून चालत आलेल्या ट्रॅक रेकॉर्डनुसार आहेत. ते धोरणं आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजाला जातीच्या आधारावर विभाजित करत आलेत,” असा टोला पुढच्या ट्विटमध्ये फडणवीसांनी लागवलाय.

  • 9/21

    “आताची हे ताजं उदाहरण पाहा जेव्हा त्यांचे मंत्री नवाब मलिक यांनी मनी लाण्ड्रींग प्रकरणामध्ये आणि अंडवर्ल्ड डॉन डाऊन इब्राहिमशी संबंध असल्याच्या प्रकरणावरुन अटक करण्यात आली”, असं म्हणत फडणवीस यांनी नवाब मलिक मुस्लीम असल्याने त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जात असलेल्या पवारांच्या प्रतिक्रियेची बातमी शेअर केलीय.

  • 10/21

    “२०१३ मध्ये ते इशरत जहाँ ही निर्दोष होती असं ऑनरेकॉर्ड म्हटले होते,” असंही फडणवीसांनी म्हटलंय.

  • 11/21

    इतक्यावरच न थांबता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी इशरतच्या मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख फडणवीसांनी केलाय.

  • 12/21

    फडणवीस यांनी २०१२ मध्ये राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असताना मुंबईतील आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली गेली यावरुनही बातमीची लिंक पोस्ट करत टीका केलीय. तसेच आघाडी सरकारने त्यावेळी रझा अकादमीवर कारवाई केली नाही, याचाही उल्लेख फडणवीसांनी केलाय.

  • 13/21

    तसेच पुढे बोलताना फडणवीसांनी संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असताना मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का घेतला, याबद्दलच्याही लिंक पोस्ट केल्यात.

  • 14/21

    अल्पसंख्यक समाज कोणाचाही पराभव करू शकतो या शरद पवारांच्या वक्तव्याची आठवणही फडणवीसांनी करुन दिली आहे.

  • 15/21

    ‘हिंदू टेरर’ हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला, असे विचारत फडणवीसांनी निशाणा साधलाय. यासोबत त्यांनी पवार हे ‘हिंदू टेरर’ शब्द वापरणारे पहिले नेते होते या बातमीची लिंक दिलीय.

  • 16/21

    सच्चर समितीचा अहवाल लागू करण्यासाठी केलेल्या मागणीचाही उल्लेख फडणवीसांनी या १४ ट्विटपैकी एकामध्ये केलाय.

  • 17/21

    तसेच १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर १३ वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे खोटे सांगितल्यासंदर्भातही फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

  • 18/21

    “कश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे चित्रण असताना असा दुटप्पीपणा का? तुमच्या छद्मी धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून?,” असा प्रश्न फडणवीसांनी शरद पवारांना विचारलाय.

  • 19/21

    तसेच, “काश्मीर फाईल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मग केवळ अनुनयाच्या हेतूने जातीय विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न का?,” असंही फडणवीस म्हणालेत.

  • 20/21

    अशी भूमिका आणि समाजामधील एकोप्याला धक्का पोहचवणाऱ्या विचारधारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतात स्वीकारार्ह नाही असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

  • 21/21

    आता या टीकेला पवार काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

TOPICS
डॉ. आंबेडकर जयंतीAmbedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकरDr Babasaheb Ambedkarदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPशरद पवारSharad Pawar

Web Title: Devendra fadanvis slams ncp chief connecting different statements of sharad pawar with constitution scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.