• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनसे
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. uddhav thackeray resign bjp devendra fadnavis could take oath cm maharashtra know salary benefits chief minister photos kak

Maharashtra CM Salary : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नेमका किती पगार मिळतो?; कुठल्या सुविधांसाठी ते पात्र असतात?

Maharashtra Chief Minister Salary & Other Benefits : राज्याचा प्रमुख म्हणून कारभार पाहणाऱ्या मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला किती पगार मिळतो, याबद्दल जाणून घेऊया.

Updated: June 30, 2022 12:58 IST
Follow Us
  • What is salary of Maharashtra CM
    1/18

    राज्यात सध्या सत्तापालट होण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

  • 2/18

    शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आले.

  • 3/18

    शिवसेनेचे ४३ आणि अपक्ष ९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. अल्पमतात आल्यामुळे अखेर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले.

  • 4/18

    भाजपा आणि शिंदेगट सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

  • 5/18

    महाविकास आघाडी सरकारमध्ये विरोधी बाकावर बसलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

  • 6/18

    गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहता मुख्यमंत्री पदाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. याचनिमित्ताने या पदाबद्दल आणि पदावर विराजमान होणाऱ्या व्यक्तीला मिळणाऱ्या सेवेंबद्दल जाणून घेऊया.

  • 7/18

    मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. मुख्यमंत्रीपद राज्यात सर्वात शक्तीशाली पद मानले जाते.

  • 8/18

    म्हणूनच मंत्री आणि आमदारांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न असते. मुख्यमंत्री हे राज्य मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात.

  • 9/18

    मुख्यमंत्री हे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. त्यामुळे राज्याचे दैनंदिन कामकाजही मुख्यमंत्री पाहत असतात.

  • 10/18

    मंत्रिमंडळातील मंत्री, राज्यमंत्री तसेच अन्य लोक यांना मुख्यमंत्री नियुक्त करतात. रोजच्या कामकाजात मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मंत्रिमंडळाची मदत होते.

  • 11/18

    राज्याच्या अधिकारक्षेत्रात मुख्यमंत्र्यांना मिळणारे अधिकार हे देशपातळीवर काम करणाऱ्या पंतप्रधानांसारखेच असतात. राज्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्याना असतात.

  • 12/18

    राज्याचा प्रमुख म्हणून कारभार पाहणाऱ्या मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला किती पगार मिळतो, याबद्दलही जाणून घेऊया.

  • 13/18

    देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्‍याला मिळणाऱ्या वेतनाचा आकडा वेगळा आहे.

  • 14/18

    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ३.४ लाख रुपये प्रतिमहिना यासोबतच आमदाराचे एका महिन्याचे वेतन पगार म्हणून मिळते.

  • 15/18

    याशिवाय मुख्यमंत्र्यांना प्रवास भत्ता, मोबाईल बील भत्ता असा खर्चदेखील दिला जातो.

  • 16/18

    पगाराव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांना मोफत वैद्यकीय उपचार, प्रतिपूर्ती आणि मोफत निवासाचा लाभ, वाहन सुविधा अशा अनेक सुविधा दिल्या जातात.

  • 17/18

    (सर्व फोटो : उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस/ फेसबुक)

  • 18/18

    (हेही पाहा : छायाचित्रकार ते ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री…उद्धव ठाकरेंच्या कारकि‍र्दीवर एक नजर )

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisभारतीय जनता पार्टीBJPमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra PoliticsशिवसेनाShiv Sena

Web Title: Uddhav thackeray resign bjp devendra fadnavis could take oath cm maharashtra know salary benefits chief minister photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.