• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. sharad pawar family diwali celebration supriya sule ajit pawar bhauji photos scsg

Photos: भाऊबीजेनिमित्त आठ बहिणींनी केलं अजित पवारांचं औक्षण; ‘पाकीट’ मात्र सुप्रिया सुळेंनाच दिलं; अन् नंतर…

खासदार सुप्रिया सुळे यांनीच शेअऱ केले केले आहेत या कार्यक्रमामधील काही फोटो आणि व्हिडीओ

October 27, 2022 18:38 IST
Follow Us
  • Sharad Pawar Family Diwali Celebration supriya sule ajit pawar bhauji photos
    1/18

    सालाबादप्रमाणे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपूर्ण कुटुंबाने बारामतीमध्ये दिवाळी साजरी केली.

  • 2/18

    शरद पवार यांच्या बारामतीमधील निवासस्थानी दिवाळी सेलिब्रेशन झालं.

  • 3/18

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी या दिवाळी सेलिब्रेशनचे काही खास फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.

  • 4/18

    अगदी भाऊबीजेपासून ते दिवाळी पाडव्यापर्यंतचे फोटो सुळे यांनी शेअर केले आहेत.

  • 5/18

    भाऊबीजेच्या दिवाशी शरद पवारांचं त्यांच्या बहिणींनी औक्षण केल्याचा व्हिडीओही सुप्रिया सुळेंनी पोस्ट केला आहे.

  • 6/18

    मात्र या सर्व फोटो आणि व्हिडीओंपैकी माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासमेत साजऱ्या केलेल्या भाऊबीजेचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

  • 7/18

    विशेष म्हणजे आठ बहिणींनी अजित पवारांना ओवाळल्यानंतर भेट म्हणून दिलेलं पाकिट मात्र अजित पवारांनी फक्त सुप्रिया सुळेंच्या हातात दिल्याचं दिसून आलं. नेमकं काय घडंल पाहूयात.

  • 8/18

    सुप्रिया यांनी आपल्या सर्वच भावांना ओवाळतानाचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत.

  • 9/18

    भाऊबीजेच्या निमित्ताने बहीण-भाऊ यांच्या नात्यांतील बंध आणखी घट्ट होतात, अशा कॅप्शनसहीत सुप्रिया यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे.

  • 10/18

    आम्ही सर्व बहिणींनी अजितदादांचे औक्षण करुन अभिष्टचिंतन केले, असं म्हणत सुप्रिया यांनी आपल्या आठ बहिणींसोबत अजित पवारांना ओवाळताना छोटा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

  • 11/18

    तसेच भाऊबीजेच्या वेळीचे आनंदाचे काही क्षण म्हणत त्यांनी अजित पवारांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

  • 12/18

    या फोटोंमध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांच्या भगिनी मनसोक्तपणे हसताना दिसत आहेत.

  • 13/18

    सुप्रिया सुळेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्या अजित पवारांचं औक्षण करुन झाल्यानंतर त्यांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत.

  • 14/18

    इतरही बहिणी मोठ्या भावाचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवारांच्या पायाला वाकल्या.

  • 15/18

    दरम्यान एकीकडे बहिणी पाया पडण्यासाठी लगबग करत असताना ओवाळून झाल्यानंतर अजित पवारांनी भेटवस्तू म्हणून एक पाकिट सुप्रिया सुळेंच्या हातात टेकवलं.

  • 16/18

    आता ओवाळलं आठ बहिणींनी आणि पाकिट सुप्रिया सुळेंनाच का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच.

  • 17/18

    मात्र सुप्रिया सुळेंच्या हातात पाकीट दिल्यानंतर अजित पवारांनी हातवारे करुनच तुमच्या सगळ्यांमध्ये हे वाटून घ्या असं सांगितल्याचं दिसून आलं.

  • 18/18

    त्यानंतर सर्वच बहिणी मोठ्याने हसत असल्याचं दिसून आलं.

TOPICS
अजित पवारAjit Pawarदिवाळी २०२४Diwali 2024शरद पवारSharad Pawarसुप्रिया सुळेSupriya Sule

Web Title: Sharad pawar family diwali celebration supriya sule ajit pawar bhauji photos scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.