-
सापांना अनेकजण घाबरतात. कारण हा पृथ्वीवरील सर्वात धोकादायक आणि विषारी प्राणी मानला जातो.
-
अनेकदा विषारी सापाने दंश मारला म्हणून व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्याही बातम्या येत असतात.
-
जगभरात सापांच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. फक्त ब्राझीलमध्ये इतके साप आढळतात की ब्राझील हा सापांचा देश म्हणून ओळखला जातो.
-
दुसरीकडे, जगात अशीही काही ठिकाणं आहेत जिथे साप दिसत नाही.
-
या देशांमध्ये साप न दिसण्याची वेगवेगळी कारणं आहेत. काही लोक याला धार्मिक कारणं मानतात तर काही वैज्ञानिक.
-
आयर्लंड हा जगातील असा देश आहे जिथे एकही साप आढळत नाही.
-
आयर्लंडमध्ये साप नसण्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते. असे म्हणतात की, आयर्लंडमध्ये ख्रिश्चन धर्माच्या रक्षणासाठी सेंट पॅट्रिक नावाच्या एका संताने संपूर्ण देशातील सापांना एकत्र घेरले आणि नंतर त्यांना आयर्लंड या बेटावरून काढून समुद्रात फेकून दिले. हे काम त्यांनी ४० दिवस उपाशी राहून केले होते.
-
शास्त्रज्ञ म्हणतात की, या देशात कधीच साप नव्हते. जीवाश्म अभिलेख विभागामध्ये आयर्लंड देशात साप असण्याची कोणतीही नोंद नाही.
-
आयर्लंडमध्ये साप नसल्याबद्दल एक कथा अशीही प्रचलित आहे की, पूर्वी येथे साप अस्तित्वात होते, परंतु प्रचंड थंडीमुळे ते नामशेष झाले. तेव्हापासून असे मानले जात होते की प्रचंड थंडीमुळे येथे साप आढळत नाहीत. (फोटो सौजन्य:संग्रहित छायाचित्र)
जगातील कोणत्या देशात शोधूनही एकही साप सापडत नाही माहितेय का? कारण जाणून व्हाल अवाक्
Country Without Snakes: ‘या’ देशांमध्ये सापडणार नाही एकही साप….काय आहे यामागील कारण…?
Web Title: There are no snakes in this country know why and brazil is the country with the largest number of species of snakes in the world pdb