-
अजित पवारांनी कालच राजभवनावर उपमुख्यमंत्री पदाची व छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासह ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
-
सध्या नऊ आमदारांचा जाहीर पाठिंबा असलेल्या अजित पवारांनी राष्ट्रवादीतुन दोन तृतीयांश आमदारांचा गट आपल्या पाठीशी असल्याचा सुद्धा दावा केला आहे.
-
महाराष्ट्र्र राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेल्या अजित पवारांच्या शिक्षणापासून ते राजकीय कारकीर्दीपर्यंत अनेक प्रश्न कालपासून वारंवार समोर येत आहेत
-
राज्य सरकारच्या पोर्टल्सवर उपलब्ध माहितीनुसार आज नवनिर्वाचित उपमुख्यमंत्र्यांचा पगार किती हे जाणून घेऊया…
-
अजित पवार यांचा पगार (Maharashtra DCM Ajit Pawar Salary) : उपमुख्यमंत्री अजित पवार फडणवीस यांचा पगार साधारण ३ लाखापर्यंत आहे.
-
तसेच उपमुख्यमंत्र्यांना राज्य सरकारतर्फे मोफत निवास सुविधा आणि वैद्यकीय सेवा, प्रवास भत्ता, दूरध्वनी भत्ता असे विविध भत्ते दिले जातात.
-
दुसरीकडे , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पगारही सुमारे तीन लाखांच्या घरात आहे. याशिवाय त्यांना आमदार म्हणून एका महिन्याचे वेतनही दिले जाते
-
सर्व पक्षांच्या निवडून आलेल्या आमदारांना एका महिन्याचा मूळ पगार साधारण १ लाख ८० हजार इतका आहे.
-
याव्यतिरिक्त महागाई भत्ता, दूरध्वनी आणि टपाल यासाठी भत्त्याची तरतूद आहे, असं मिळून हा आकडा २ लाख ३० हजारांच्या घरात जातो. शिवाय माजी आमदारांना ५० हजार पेन्शन म्हणून देण्याची सुद्धा तरतूद आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना किती पगार मिळणार? राज्याच्या तिजोरीतून ‘हे’ भत्तेही मिळणार
Maharashtra Deputy CM Ajit Pawar Salary: महाराष्ट्राच्या राजकारणात सिनेमासारखा ट्विस्ट आणणाऱ्या अजित पवार यांना आता नव्यने उपमुख्यमंत्री बनल्यावर पगार किती मिळणार हे पाहूया ..
Web Title: Maharashtra deputy cm ajit pawar salary how much does maharashrtra cm eknath shinde earns in a month mla salary details svs