• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ganesh utsav 2023 pune kesari wada ganpati aagman sohala dhol tasha pathak flower rangoli tilak family photos sdn

Photos: ढोल-ताशांचा गजर आणि फुलांची सजावट; पुण्यातील केसरीवाड्यात महिनाभर आधीच गणेशोत्सव

टिळक पंचांगानुसार विधिवत गणरायाची प्रतिष्ठापना

Updated: August 21, 2023 10:19 IST
Follow Us
  • Pune Kesari Wada Ganpati Aagman 2023
    1/15

    Pune News: ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष, ढोल-ताशांचा गजर, फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान झालेली गणरायाची मूर्ती, पारंपरिक पेहरावात मिरवणुकीत सहभागी झालेले भक्त… अशा उत्साही वातावरणात केसरीवाडा या मानाच्या पाचव्या गणपतीच्या गणेशोत्सवाला रविवारी सुरुवात झाली.

  • 2/15

    अन्य पंचांगानुसार गणेशोत्सव महिन्याभराने असला तरी टिळक पंचांगानुसार केसरीवाड्यामध्ये गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

  • 3/15

    सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे पुन्हा उत्सव साजरा केला जाणार असून अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन होणार आहे.

  • 4/15

    उत्सवप्रमुख डॉ. रोहित टिळक आणि डॉ. प्रणति टिळक यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

  • 5/15

    त्यापूर्वी रमणबाग चौकातील मूर्तिकार महेश गोखले आणि विद्धेश गोखले यांच्याकडून घेण्यात आलेली गणरायाची मूर्ती पालखीच विराजमान झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूकीला सुरुवात झाली.

  • 6/15

    पावसाच्या हलक्या सरींमुळे ढोल-ताशा पथकातील वादकांमध्ये उत्साह संचारला होता.

  • 7/15

    केसरीवाड्यातील गणेश मंदिरासमोर अभिनव कलाभारतीतर्फे आकर्षक रांगोळी साकारली होती.

  • 8/15

    गणरायाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.

  • 9/15

    पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीपसिंग गिल यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

  • 10/15

    डॉ. दीपक टिळक, डॉ. गीताली टिळक, रौनक टिळक, कृतिका टिळक या वेळी उपस्थित होते.

  • 11/15

    कौस्तुभ खळीकर यांनी प्रतिष्ठापनेच्या पूजेचे पौरोहित्य केले.

  • 12/15

    केसरी गणेशोत्सवात २८ ऑगस्टपर्यंत लोकमान्य सभागृहात दररोज सायंकाळी साडेसहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

  • 13/15

    केसरी या लोकमान्य टिळक यांच्या संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : पवन खेंगरे आणि सागर कासार / लोकसत्ता)

  • 15/15

    (हेही पाहा : ‘सूर्याजी मालुसरे ते जीवा’; ‘सुभेदार’ चित्रपटातील कलाकारांचं लूक पाहिलेत का?)

TOPICS
गणेश उत्सव २०२३Ganpati Festivalगणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025पुणे न्यूजPune Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ganesh utsav 2023 pune kesari wada ganpati aagman sohala dhol tasha pathak flower rangoli tilak family photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.