-
भारताच्या दळणवळणामध्ये रेल्वेचा मोठा वाटा आहे. भारतात कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात.
-
भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क असून भारताच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचं जाळ विखुरलेलं आहे.
-
आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी रेल्वेने प्रवास केला असेलच, बहुतांश लोकांना रेल्वेच्या अनेक नियमांविषयी माहिती नसते.
-
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की कधी कधी ट्रेनला स्टेशन येण्यापूर्वीच काही अंतरावर थांबवलं जात.
-
कधी कधी एक, दोन तास किंवा त्याहून अधिक वेळ ट्रेन उभी ठेवली जाते. असे अनेकदा होते.
-
पण रेल्वे अशी का थांबवली जाते, याचे कारण तुम्हाला माहिती आहे का..? चला तर जाणून घेऊया…
-
भारतीय रेल्वे नेटवर्कची व्याप्ती खूप मोठी आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. भारतीय रेल्वे ६८,१०३ किमी लांबीसह जगातील चौथ्या नंबरचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.
-
याठिकाणी दररोज हजारो ट्रेन धावतात. यापैकी काही गाड्या लोकल आहेत तर काही लांब पल्ल्याच्या आहेत.
-
या गाड्या स्टेशनवर येण्यापूर्वी एक ठराविक वेळ निश्चित केली जाते. ज्यांच्यानुसार घोषणाही केली जाते. यासोबत प्रत्येक ट्रेनसाठी एक प्लॅटफॉर्मही निश्चित करण्यात आला आहे.
-
काही कारणांमुळे गाड्या उशिरा येतात. याचे कारण म्हणजे यावेळी दुसरी ट्रेन येण्याची वेळ होते.
-
अशावेळी स्टेशन मॅनेजर ट्रेननुसार कोणती ट्रेन आधी स्टेशनवर आणायची ते ठरवतात. जर सुपरफास्ट ट्रेन आली आणि पॅसेंजर ट्रेन येत असेल तर तिला बाहेरच्या बाजूने थांबण्याची सूचना दिली जाते.
-
त्यामुळे ती ट्रेन बाहेरच्या बाजूने थांबवली जाते. यामुळेच कधीकधी ट्रेन स्टेशनला येण्याआधीच काही अंतरावर थांबविल्या जातात. (फोटो सौजन्य : indian express)
रेल्वे स्टेशनवर येण्यापूर्वीच अनेकदा काही अंतरावर का थांबविली जाते? जाणून घ्या यामागचं नेमकं गमक…
अनेकदा तुम्ही पाहिलं असेलच, रेल्वे स्टेशनवर येण्याआधीच काही अंतरावर थांबविली जाते, यामागचं नेमकं कारण काय आहे, चला तर जाणून घेऊया…
Web Title: Have you ever wondered why trains sometimes stop ahead of the station heres know reason pdb