Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. before arvind kejriwal these 5 chief ministers in india were arrested asc

अरविंद केजरीवालच नाही, तर त्यांच्या आधी ‘या’ पाच मुख्यमंत्र्यांना झाली आहे अटक

या वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांच्यावर कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडरिंगप्रकरणात ईडीने कारवाई केली.

April 2, 2024 22:50 IST
Follow Us
  • Arvind Kejriwal
    1/13

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने गेल्या आठवड्यात अटक केली. अजूनही ते ईडीच्या कोठडीत आहेत. केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. मुख्य म्हणजे मुख्यमंत्रिपदावर असताना अटक करण्यात आलेले ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत. (PC : Arvind Kejriwal/X)

  • यापूर्वीही ईडीने किंवा इतर संरक्षण यंत्रणांनी मुख्यमंत्र्यांवर कारवाई केली असून राजीनाम्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. (PC : Arvind Kejriwal/FB)
  • 2/13

    याच वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांच्यावर कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडरिंगप्रकरणात ईडीने कारवाई केली. ईडीकडून अटक होण्यापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. (PC : PTI)

  • 3/13

    हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर जेएमएमने मुख्यमंत्रिपदाची धुरा हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय चंपाई सोरेन यांच्याकडे सोपवली. (PC : Indian Express)

  • 4/13

    सर्वात प्रथम ज्या मुख्यमंत्र्याला अटक करण्यात आली होती, त्या होत्या जे. जयललिता. १९९६ मध्ये एआयएडीएमकेच्या तत्कालीन प्रमुख दिवंगत जे. जयललिता सत्तेवर असताना त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. (PC : Indian Express)

  • 5/13

    ७ डिसेंबर १९९६ ला जयललिता यांना अटक करण्यात आली होती. गावकऱ्यांसाठी टीव्ही संच खरेदीत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून एका महिन्यासाठी त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं होते. बंगळुरू न्यायालयाने २०१४ मध्ये जयललिता यांना बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. (PC : Indian Express)

  • 6/13

    जयललिता यांना आमदार म्हणूनही अपात्रतेला सामोरे जावे लागलं होतं. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागलं. (PC : Indian Express)

  • 7/13

    जयललिता मुख्यमंत्री असताना तमिळनाडू पोलिसांनी ३० जून २००१ रोजी तत्कालीन डीएमकेप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांना चेन्नईतील त्यांच्या मैलापूर येथील घरातून अटक केली होती. त्यावेळी करुणानिधी यांचे पुतणे मुरासोली मारन यांनी आरोप केला होता की करुणानिधींना घराबाहेर काढताना पोलिसांनी मारहाण केली होती. (PC : Indian Express)

  • 8/13

    त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असणारे मारन आणि त्यांचे पक्ष सहकारी टी. आर. बालू यांना कारवाईत हस्तक्षेप केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. पोलिसांशी झालेल्या झटापटीत मारन जखमी झाले होते. एखाद्या केंद्रीय मंत्र्याला अटक होण्याची ही पहिलीच घटना असल्याचं म्हटलं जात होतं. (PC : Indian Express)

  • 9/13

    २५ जुलै १९९७ रोजी बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी अटक वॉरंट बजावण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. लालू प्रसाद यादव चार महिने तुरुंगात होते, त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. (PC : Indian Express)

  • लालू प्रसाद यादव यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्नी राबडी देवी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. या प्रकरणात लालू प्रसाद यादव वारंवार तुरुंगात गेले. आतापर्यंत ते सहा वेळा तुरुंगात जाऊन आले आहेत. (PC : Indian Express)
  • 10/13

    जेएमएमप्रमुख आणि हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन यांना डिसेंबर २००६ मध्ये अटक करण्यात आली होती. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असताना शिबू यांचे खासगी सचिव शशी नाथ झा यांचे अपहरण आणि हत्याप्रकरणात शिबू सोरेन यांना दोषी ठरवण्यात आले होतं. अटकेपूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. (PC : Indian Express)

  • 11/13

    २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची निर्दोष सुटका कायम ठेवली. या निर्णयात असे सांगण्यात आले की, डीएनए नमुने जुळत नसल्यामुळे मृतदेह त्यांच्या खासगी सचिवाचा असल्याचा कोणताही पुरावा नाही.(PC : Indian Express)

TOPICS
अरविंद केजरीवालArvind Kejriwalआम आदमी पार्टीAAPट्रेंडिंग न्यूजTrending Newsदिल्लीDelhi

Web Title: Before arvind kejriwal these 5 chief ministers in india were arrested asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.