-
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. ‘कसौटी जिंदगी की’ या टीव्ही मालिकेतून घराघरात नाव कमावणारी ही अभिनेत्री केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते.
-
४३ वर्षांची आणि दोन मुलांची आई असूनही श्वेता सौंदर्याच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करताना दिसते.
-
अशा वेळी लोकांच्या मनात एकच प्रश्न असतो, तो म्हणजे श्वेता तिवारीच्या सौंदर्याचे रहस्य तरी काय? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.
-
दरम्यान, एका मुलाखतीदरम्यान श्वेता तिवारीने सांगितले होते की, ती निरोगी राहण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी काही खास पद्धतींचा अवलंब करते. या पद्धती काय आहेत ते जाणून घेऊयात.
-
CTM नियम व कुमकुमदी तेल
तिची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी श्वेता तिवारी तिच्या दिवसाची सुरुवात CTM नियमाने करते. CTM म्हणजे क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. यासोबतच चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी ती कुमकुमदी तेलाचा वापर करते. -
व्यायाम
मुलाखतीदरम्यान श्वेता तिवारीने सांगितले होते की ती निरोगी शरीर आणि त्वचेसाठी नियमित व्यायाम करते. -
हायड्रेशन
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हायड्रेशन सर्वात महत्त्वाचे असल्याचेही अभिनेत्री म्हणते. यासाठी ती वेळोवेळी पाणी पीत राहते आणि तिच्या आहारात पाणीयुक्त गोष्टींचाही समावेश करते. -
हळद पेस्ट
चमकदार त्वचेसाठी, श्वेता दुधात थोड्या प्रमाणात हळद मिसळते आणि पेस्ट म्हणून वापरते. अभिनेत्री म्हणते की हे मिश्रण तिची त्वचा चमकदार करण्यास मदत करते. -
मुलतानी माती फेस पॅक
या सगळ्याशिवाय श्वेता वेळोवेळी मुलतानी माती फेस पॅक वापरते. अभिनेत्री म्हणते की हा पॅक तिच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल साफ करण्यास मदत करतो.
Shweta Tiwari : श्वेता तिवारी ४३ व्या वर्षीही २५ वर्षांची दिसते, तिच्या सुंदर त्वचेचे व चिरतरुण असण्याचे रहस्य आहे तरी काय?
Shweta Tiwari Beauti : एका मुलाखतीदरम्यान श्वेता तिवारीने सांगितले होते की, ती निरोगी राहण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी काही खास पद्धतींचा अवलंब करते. या पद्धती काय आहेत ते जाणून घेऊया.
Web Title: Shweta tiwari beauty secret at 43 know how to keep skin young glowing and hydrated spl