-
१३ जानेवारीपासून महाकुंभ मेळा २०२५ सुरू होत आहे. प्रयागराज येथे होणाऱ्या या मेळ्यात देशासह जगभरातून भाविक स्नानासाठी येणार आहेत.
-
येथे येणाऱ्या भाविकांच्या राहण्यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. कदाचित अशी व्यवस्था याआधी तुम्हीही कधी पाहिली नसेल.
-
संगमाच्या काठावर आश्रमापासून धर्मशाळा आणि अगदी खास टेंट सिटीपर्यंत व्यवस्था करण्यात आली आहे.
-
यासह येथे खास डोम सिटी बांधण्यात आली, ज्याची सध्या खूप चर्चा आहे. कारण या डोम सिटीमध्ये बांधलेल्या रुम्समध्ये अशा काही लक्झरीयस सुविधा दिल्या आहे की पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
-
पण डोम सिटीमध्ये एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आजच जाणून घ्या.
-
डोम सिटी येथील प्रत्येत खोली अतिशय आलिशान आहे. 3 हेक्टरवर बांधलेली ही डोम सिटी फायर आणि बुलेट प्रूफ आहे.
-
विशेष स्नानाच्या दिवशी, या डोम सिटीमधील एका खोलीचे दररोजचे भाडे १,१०,००० रुपये आहे.
-
त्याच वेळी, कुंभ मेळ्यादरम्यान सामान्य दिवसांमध्ये याच खोल्यांचे एका दिवसाचे भाडे ८१,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
-
तर सामान्य दिवसांमध्ये, डोम सिटीमध्ये रूम बुक करण्यासाठी तुम्हाला ४१,000 रुपये मोजावे लागतील. (फोटो: MahaKumbh 2025, DoT India,PTI/ Twitter)
Mahakumbh 2025 : महाकुंभ मेळ्यासाठी उभारण्यास आली डोम सिटी, एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे किती? किंमत वाचून व्हाल अवाक्
Mahakumbh 2025 Dome City : महाकुंभ मेळा 2025 मध्ये यंदा भाविकांच्या राहण्यासाठी अनेक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. त्यात खास डोम सिटीही बांधण्यात आली आहे. पण इथे एक रात्र राहण्यासाठी किती रुपये मोजावे लागतील एकदा जाणून घ्या.
Web Title: How much is the fare for one night stay in dome city during mahakumbh 2025 sjr